Did you like the article?

Tuesday, May 4, 2021

Bardeskars – The Native Goans


Se Cathedral, venue of decennial exposition of relics of St. Francis Xavier, at Old Goa. (Photo by Camil Parkhe )

Soon after appearing for the SSC examination, I left my family in Shrirampur and joined Fr. Prabhudhar at his `Snehasadan' residence in Karad as a step to become a Jesuit priest like him. This was in June 1976. This introduced me to a new Christian community. Fr. Prabhdudhar took me around to Ichalkaranji, Gadhinglaj, Ajara, Chandgad talukas of Kolhapur district and Belgaum district in neighbouring Karnataka state.

During this tours, I was introduced to the Bardeskar community, the Christians who had migrated from Bardez taluka of Goa about three centuries ago and settled in above places.
The various facets of the Bardeskar community fascinated me. The social, cultural, religious, educational and financial characteristics of this community were drastically different from the Christian community from Aurangabad, Nashik and Ahmednagar districts – a community I represented.
First of all, they spoke a different language in their family and amongst themselves – Konkani, the language of their ancestors from Goa which they had preserved for over 300 years after being cut off from their native land. At that time local Hindus referred them as Bardeskars- an identity of their migration- but gradually switched over to their original family names from Goa like D’Souza, Fernandes, Monteiro, Lobo, Mascarenhas, et al. Now many of the younger members of this community may not like to be referred to Bardeskars. They would prefer to call themselves as natives from Goa.
In addition to the language, their names and surnames, they had also preserved the faith of their ancestors – Christianity, Catholic faith to be precise. In Goa, one does call oneself as a Christian but as a Catholic. This was indeed a feat considering that there were no priests or catechists who introduced them to tenets of the Christian religion.
The strict adherence of the Bardeskars to the Roman Catholic faith - sans presence of the clergy for over a century - astonished me. The presence and role of the priests is very important in a well organised relion like Christianity, especially the Catholic Church. The priests are required to administer the seven sacraments like baptism and wedding in various stages of life of the faithful.
I had experienced how long absence of the priests led to the wiping out of the Christian faith in Marathwada region, Ahmednagar, Nashik and other districts in western Maharashtra. In those regions, people who embraced Christianity under the influence of the European Protestant and Catholic missionaries in 19th and 20th centuries later did not get the adequate pastoral care and had therefore returned to the Hinduism or embraced Buddhism. The Bardeskars community, it seemed, was strongly entrenched into the religious faith of their ancestors.
Once Fr. Prabhudhar took me to Gadhinglaj where J. B. Bardeskar had established Sadhana Vidyalaya. This made me aware of the progress the Bardekars had achieved in social and educational spheres. Bardeskar Sir to whom I met at his residence was at that time one of the tallest and most respectable figures in the Bardeskar community. The other members of the Bardeskar community had also gained a respectable status among the majority populace. Some were teachers in colleges and schools while others were employed in respectable positions in government departments and private firms.
After migrating from Goa two-three centuries ago, Bardeskars in the borderlines of Kolhapur and Belgum districts (adjoining the Western Ghats) have fully assimilated into the local populace, acquiring fluency in local Marathi and Kannada languages, and yet, maintaining their distinct identity with preservation of their mother tongue Konkani and Christian faith. While travelling to Ajara, Watangi, Hebbal, Chandgadh, Santibastwad near Belgaum and other places, I realised that the Bardeskars had also acquired land, built houses in their new, migrated land. Possession of the agricultural land helped them to be one among the other populace and also offered them gainful livelihood.
The English medium school, Rosary School Ajara, Sarvodaya Khanapur and Sadhana Vidyalaya from Gadhinglaj helped the children to acquire fluency in the language of the modern age.
Once I attended a marriage of a Bardeskar couple, perhaps in Watangi near Ajara. There I was introduced to the folklore, marriage rituals and traditions followed in this community. There were Konkani folk songs when the bridegroom and bride left their houses for the marriage ceremony. The men and women joined in singing the Konkani songs as the marriage parade went from one place to the and later reached at the church where a priest administered the wedding sacrament to the couple.
I also attended the ordination ceremony of Fr. Caridade Drago, a Jesuit, at his native place Santibastwad near Belgaum. There were similar rituals and songs prior to the ordination ceremony which was presided over by Belgaum diocese bishop. (Only a bishop or a clergy of a higher rank in the Catholic Church can preside over ordination ceremony of a priest.)
A few years before that, I had also attended the ordination ceremony of Fr. James Shelke, also a Jesuit, at his native village Umbari near Sangamner in Ahmednagar district. In both cases, the local Christian community had hosted meals for the gathered assembly on the occasion. At Fr. Shelke’s ordination ceremony, there were no typical local Christians’ rituals and tradition as Christianity in Ahmednagar district in 1970s was only 100 years old and hardly a couple of priestly ordinations had taken place in this community by that period.
These Konkani folk songs, rituals and other traditions connected to the marriage and other ceremonies were obviously brought along by the Bardeskars when they left their native villages in Bardez in Goa two centuries back. I wondered whether these songs are still sung and this kinds of marriage traditions are followed to this date back in those villages in Goa?
Same also holds true about various Konkani words, Portuguese –origin phrases as well as songs spoken by the Bardeskars now and which may have been now extinct in the vocabulary of people in Goa. Invariably, some Marathi or Kannada words too may have slipped into the vocabulary of the Bardeskars.
It is a known fact that the Konkani spoken among the Catholics, especially among in south Goa, has many Portuguese-origin words like Kadel for chair, whereas the Hindus may use the word Khurchi which is also used in Marathi. Similar other Portuguese-origin words are Kantar for song (Gayan or Gaani in Marathi) Kaajar for wedding (Lagna in Marathi), Igraj for Church, Kapel for chapel, and so on.
These migrated people however took utmost care to retain their umbilical chord with their villages in Goa. They renewed their shares or Zonne in the village Communidade - a cooperative of land holding villagers –which is only seen in Goa and no where else in India. The elders took pains to visit Goa to register the names of their children as heirs as Zonnkar in the communidade, similar to the Index 7/12 form of the British legacy in India.
During the subsequent frequent visits to various villages in Kolhapur district, I realised that the Bardeskars were not exactly a homogenous community as it seemed to outsiders. There was no tradition of marital relations among all families of Bardeskars. Some families from a village would have marital relations with only families of particular villages. This underlined the caste differences among the Catholic Bardeskar community – a legacy of their castes before their conversion to Christianity in Goa 200 or 300 years before.
People belonging to the Saraswat, Kshatriya and various other castes were converted to Christianity after the Portuguese established their political rule in Goa in early 16th century. Despite the Church’s emphatic refusal to accept existence of casteism among the Christians, the practise had nonetheless continued over the past few centuries and the Bardeskars had carried along with them this dubious legacy.
St. Francis Xavier whose relics are kept at Bom Jesu Basilica in Old Goa has also been a factor drawing the Bardeskars to their native place. Even during the Portuguese regime which ended only in 1961, the Bardeskars visited Goa to attend the feast of this Goencho Saiba, falling on December 3.
Goans are spread in different parts of India and also all over the world. What is the definition of a Goan? It is a most debatable and controversial issue just like the definition of Punekar. Books have been written on the true identity of a Goan. Bardeskars are true Goans although often those residing in Goa may scoff at them as being ‘Bhailo’, the outsider.
As a reporter of The Navhind Times English daily at Panjim in Goa in 1983, I covered the news of Fr. Prabhudhar, himself a Bardeskar, leading a team of pilgrims from Kolhapur district to participate in the annual feast of St. Francis Xavier at Old Goa. The pilgrims had covered the distance from Ajara in Kolhapur district to Old Goa on foot and our newspaper had highlighted the news with my byline and a headline ‘’Their ways of reaching Him’’.
This news aroused curiosity of these Goans settled in neighbouring states and there were a couple of letters to the editors in this regards. This further prompted me to write two articles in The Navhind Times on the prevalent social, economic, religious and linguistic situation of the Bardeskars and various theories related to the causes of their migration.
Reading these two articles, then Margao's independent State legislator (MLA) and also a Konkani writer Uday Bhembre, congratulated me on highlighting the hitherto unknown aspects of the Bardeskar community and appreciated the Bardeskars for preservation of their mother tongue in their new land despite many odds. He further added that the Bardeskar community settled outside Goa is a fine case study for researchers in various faculties of knowledge including sociologists, historians, anthropologists, linguistics and others.
There was a long felt need to conduct research on the exodus of the Christian community from Bardes taluka to neighbouring Maharashtra and Karnataka states. As Alphie Monteriro has now written a book on history and culture of the Brdeskar community, entitled ‘’The Bardeskars- The history of migration .
The book will be published today through virtual mode an online ceremony to be attended by Belgaum Bishop Derek Fernandes, Pune Bishop Thomas Dabre and Sindhudurg Bishop Allwyn Baretto. The quest for knowing the roots and origins of the Bardeskar community has led Monteiro to conduct this research. I have known the Pune-based author for the past several years and the issue of various theories about migration of the Bardeskars from Goa invariably featured in our conversation.
In his quest for the right answers, Monteiro has met several people, referred to various books and articles. As a person interested in social history of Bardeskars and also Christians in India, I am happy to be part of this journey searching the root of the Bardeskar community.
To order copy of the book, message on 09370665992 to Alphie Monteiro or 09561083773 to Philo Monteiro ..
This is Se Cathedral, the venue of decennial ex\position of relics of St. Francis Xavier, at Old Goa.

Saturday, May 1, 2021

 

‘सिएस्ता’ला ‘होली अवर’ असे का म्हणायचे, हेही आता समजते आहे…
संकीर्ण - ललित
कामिल पारखे


  • ‘अक्षरनामा’
  • पेंटिंग ‘विकीपीडिया’वरून साभार
  • Tue , 20 April 2021
    • संकीर्णललितसिएस्ताSiestaवामकुक्षीहोली अवरHoly Hour


वयाच्या १७व्या वर्षी गोव्यात मिरामारच्या जेसुईटांच्या पूर्व-सेमिनरी (प्री-नॉव्हिशिएट)मध्ये दाखल झालो. जेसुईटांच्या किंवा इतर कुठल्याही ख्रिस्ती धर्मगुरूंच्या संस्थेत सगळा जीवनक्रम शिस्तबद्ध असतो. पहाटे साडेपाच वाजता पितळेची घंटी वाजवून सर्व मुलांना झोपेतून उठवून दिवसाची सुरुवात होई. तयारी करून मनन-चिंतन आणि सकाळचा मिस्साविधी होई आणि रात्री साडेदहा वाजता पुन्हा घंटी वाजून आपापले दिवे मालवून सर्व प्री-नॉव्हिसांना आपल्या मच्छरदाणीच्या बेडमध्ये शिरावे लागे. दिवसाच्या मध्यंतरात म्हणजे हाऊसमधल्या सर्वांनी एकत्रित जेवून आपापली ताटे धुऊन पुढचा अर्धा तास रिक्रिएशन पिरिअड म्हणजे विरंगुळा काळ हा पत्ते, बुद्धिबळ खेळण्यात, गिटार वाजवण्यात, कादंबऱ्या वाचत घालवायचा. बरोबर दीडच्या ठोक्याला बिडलने म्हणजे मॉनिटरने घंटी वाजवल्यावर पुन्हा एकदा आपल्या बेडवर दुपारच्या झोपेसाठी निद्रित व्हायचे!

या सक्तीच्या झोपेच्या वेळेत कुणालाही कसलाही आवाज करण्याची मुभा नसायची. दुपारची ही झोप म्हणजे ‘सिएस्ता’. एक तासानंतर अडीचला घंटी वाजल्यावर उठून कॉलेजच्या अभ्यासाला लागायचे. आम्ही सर्व प्री-नॉव्हिस मुले मिरामारला धेम्पे आर्टस्-सायन्स कॉलेजात किंवा पणजीतल्या डेम्पो कॉमर्स कॉलेजात शिकत होतो. या काळात दुपारच्या जेवणानंतर गाढ ‘सिएस्ता’ घेण्याची सवय लागली, ती आजपर्यंत सुटलेली नाही.

गोव्यात हा एक अगदी संवेदनशील, जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या वेळी कुणालाही भेट देणे, फोन करणे शिष्टाचारविरोधी समजले जाते. दुपारी चारनंतर दैनंदिन व्यापार पुन्हा सुरू होतात. पत्रकारितेच्या व्यवसायात हा शिष्टाचार मी नेहमीच पाळत आलो आहे. रविवारी आणि इतर सुट्टीच्या दिवशी कुणाही व्यक्तीला दुपारी फोन करणे शक्यतो या कारणासाठीच टाळत आलो आहे.

भारतात सगळीकडे ख्रिस्ती मिशनरींच्या जीवनात ‘सिएस्ता’ एक महत्त्वाची बाब असायची. बहुतेक ख्रिस्ती धर्मगुरूंच्या दिनचर्येत हे अनुकरण आजही होतेच. त्या एक तासाला ‘होली अवर’ असे म्हटले जाते.  

श्रीरामपूरला लहानपणी सूर्य उगवण्याआधीच उठून बसायची सवय होती. माझ्याआधीच दादा उठून ‘पवित्र क्रुसाच्या खुणेने’ असे म्हणत कपाळावर, छातीवर आणि खांद्यांवर क्रुसाची खूण करत अर्धा तास सकाळची प्रार्थना करायचे. पण जागा होऊन चुळबूळ करत असलेल्या मला पाहून ‘सकाळीच असे भुतासारखे उठून काय बसायचे?’ असे बाई चिडून म्हणायची, पण जाग आल्यावर बिछान्यावर पडून राहणे, लोळणे कधी जमलेच नाही. घरी दुपारी झोप येणे तर अशक्यच.

पदवीधर झाल्यानंतर फादर होण्याचा निर्णय मी बदलला अन अगदी अपघाताने पत्रकार झालो. १९८०च्या दशकात आम्ही सर्व बातमीदार मंडळी सकाळी साडेनऊच्या आसपास मांडवीच्या तीरावरील मध्ययुगीन आदिलशहाच्या राजवाड्यात असलेल्या गोवा सचिवालयाच्या प्रेस रूममध्ये जमायचो. (गोवा सचिवालय आता पर्वरीला गेले असले तरी तळमजल्यावरच्या अगदी कोपऱ्यातल्या प्रेसरूमचा तो बोर्ड अजूनही आहे.) सकाळच्या प्रेस कॉन्फरन्स, मंत्र्यांच्या नि सचिवांच्या भेटीगाठी आटोपून बारापर्यंत आम्ही आपापल्या दैनिकांच्या ऑफिसांत पोहोचायचो. तेथे बातम्या टाईप करून दुपारी एकच्या आसपास घरी निघायचो. सिनिअर पत्रकारांची पर्वरीला पत्रकार कॉलनीत घरे होती. मी सान्त इनेजच्या टोकापाशी ताळगावला राहायचो. पंधरा मिनिटांत जो तो आपापल्या घरी फिश-करी-राईस खायला हजर. नंतर मस्तपैकी सिएस्ता आणि परत फ्रेश होऊन चारला प्रेसरूमला येऊन तेथे किंवा एखाद्या प्रेस कॉन्फरन्समध्ये चहापानाला हजर.

दुपारच्या त्या झोपेने दिवसभर मरगळ जाणवायची नाही. विशेष म्हणजे पणजीतील आणि गोव्यातील म्हापसा, मडगाव अशा इतर काही शहरांतील अनेक दुकानदारसुद्धा या सिएस्तासाठी आपली दुकाने दुपारी एक-दोन तास बंद ठेवत असत.

गोव्यात ४५० वर्षे असलेल्या पोर्तुगीज राजवटीचा सिएस्ता हा आणखी एक भलाबुरा सांस्कृतिक वारसा! पोर्तुगिजांनी गोव्यात तसे अनेक सांस्कृतिक वारसे मागे ठेवले आहेत. कामावरून संध्याकाळी किंवा रात्री घरी परतल्यावर पेयपान आणि जेवणाआधी अंघोळ करून ताजेतवाने व्हायचे, ही गोव्यातील अनेक लोकांची सवय हा त्यापैकीच एक. आजही मी रात्री जेवणाआधी अंघोळ करतो. त्यामुळे ‘दुपारी एक ते चार दुकान बंद’ अशी चैन किंवा मक्तेदारी केवळ पुण्यातच चालते असे म्हणण्यात काही अर्थ नाही.

खरे पहिले तर सिएस्ता म्हणजेच वामकुक्षी, पण तरीही या दोन्ही संज्ञा दोन वेगवेगळ्या ठिकाणी लोकप्रिय आहेत. जसे पुण्यातली ‘वामकुक्षी’ आणि गोव्यातली ‘सिएस्ता’. भाषेनुसार वेगळे सांस्कृतिक संदर्भ आहेत.

गोवा सोडले तरी पुण्यातील ‘इंडियन एक्सप्रेस’च्या बातमीदारांच्या कामकाज पद्धतीने ‘सिएस्ता’ची सवय कायम राहिली. पत्रकार आणि वृत्तपत्र कामगार कायद्यानुसार पत्रकाराला दिवसा सहा तास आणि रात्री साडेपाच तास काम करावे लागे. त्यामुळे आम्ही सर्व बातमीदार दुपारी अडीच-तीनच्या सुमारास पुणे कॅम्पातील अरोरा टॉवर्समधील ऑफिसात यायचो, रात्री नऊच्या सुमारास काम संपत असायचे.  या काळात मी चिंचवडगावात राहायला आलो होतो, घरी दुपारी जेवून सिटी बसने पुण्याला शिवाजीनगरपर्यंत यायचो, तेव्हा बसमध्ये अर्धा तास मस्तपैकी पेंगून सिएस्ता पूर्ण व्हायची. अनेकदा बस कंडक्टर किंवा सहप्रवासी शेवटच्या स्टॉपवर मला जागे करायचे. दुपारच्या किंवा कुठल्याही वेळेचे अशा प्रकारचे झोपेचे सुख केवळ नेहमी बस किंवा लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाच माहीत असते. 

‘टाइम्स ऑफ इंडिया’त जॉईन झालो, तेव्हा पुणे आवृत्तीचे ऑफिस शिवाजीनगरहून फर्ग्युसन कॉलेज रोडवर हॉटेल वैशालीपाशी स्वतःच्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरीत झाले होते. कामाचे तास दुपारी अडीच ते रात्री दहा. त्यामुळे चिंचवडगाव ते मॉडर्न महाविद्यालयाच्या बस स्टॉपपर्यंत माझा सिएस्ताचा सिलसिला कायम राहिला. तेथून पाच-दहा मिनिटांच्या अंतरावर ‘टाइम्स`चे ऑफिस आहे. अधूनमधून उशीर झाल्यास बसस्टॉपवरून रिक्षाने मी ऑफिसला जात असे. एकदा बालगंधर्व चौक ओलांडल्यावर पाठमोऱ्या आरश्यामधून माझ्याकडे पाहत रिक्षा ड्रायव्हर म्हणाला, ‘तुम्ही ‘घेतली’ आहे, हे मला माहीत आहे.’ थक्क होऊन मी त्याला यामागचे कारण विचारले, तर तो म्हणाला, ‘तुमचे लालबुंद डोळेच सर्व काही सांगतायत.’ मी रिक्षाच्या आरशात पाहिले तर माझे डोळे खरेच तसे होते. बसमधल्या त्या अर्ध्या तासाच्या गाढ झोपेचा तो परिणाम, पण त्या रिक्षा ड्रायव्हरला काय सांगणार?

‘महाराष्ट्र हेराल्ड’ व ‘सकाळ टाइम्स’ या ‘सकाळ’ माध्यमसमूहाच्या इंग्रजी दैनिकांसाठी १६ वर्षे न्यूज डेस्कवर आणि नंतर न्युज ब्युरोत बातमीदार म्हणून काम केले. तेव्हासुद्धा बहुतांश काळ कुणालाही हेवा वाटेल, अशी या सिएस्ताची चैन उपभोगली.

आजवर ही चैन उपभोगू शकलो, यामागे एक कारण आहे. ते म्हणजे पुण्यात आल्यापासून दुचाकी किंवा चारचाकी वाहनाचा वापर न करता नेहमीच सिटी बसने प्रवास केला. त्यामुळेच घरच्यांचा रोष पत्करून आणि सहकारी पत्रकारांच्या अवहेलनात्मक, कुत्सित प्रतिक्रियांना न जुमानता माझा हा चिंचवडगाव-शिवाजीनगर निद्रिस्त बसप्रवास तब्बल तीन दशकांपासून चालू आहे. 

हा प्रवास तसा फार सुखाचा नव्हता. १९९०च्या दशकात माझ्या घरासमोरून जाणाऱ्या १२२ क्रमाकांच्या चिंचवडगाव–पुणे मनपा बस २० किंवा ३० मिनिटांच्या अंतराने यायची. आज ३० वर्षानंतरही तीच परिस्थिती आहे. अनेकदा बस गच्च भरलेली असल्यास पुढे सीट न मिळणार नाही आणि सिएस्ताचा लाभ घेता येणार नाही, या जाणिवेने ती सोडून द्यावी लागे. आणि पुढच्या बसची आणखी अर्धा तास वाट पहावी लागे. निद्रादेवीच्या या आराधनेसाठी अनेकदा चिंचवडगावात मागे जाऊन जागा पटकावण्याचा द्राविडी प्राणायाम केला आहे.

मुंबईत लोकल प्रवास करणाऱ्यांसाठी यात विशेष असे काही नसणार. ऑफिसला ठराविक वेळेवर पंचिंग करण्याची गरज नसल्याने तसे टेन्शन नसायचे. मात्र उशीर होऊ नये म्हणून प्रवासासाठी वाढीव वेळ मी नेहमीच गृहीत धरत असे. एकदा नेहमीची आरामदायक सीट पकडली की, बॅग छातीपाशी ठेवून डोळे मिटले की, काही क्षणांत ब्रह्मानंदी टाळी लागत असे. यापेक्षा दुसरे स्वर्गसुख कुठले!     

मात्र कधीतरी भरलेल्या बसमध्ये शिरावे लागे. अशा वेळी व्हीआयपी व्यक्तीच्या मागे बॉडीगार्ड ज्या नजरेने सगळीकडे टेहळणी करत असतो, त्याप्रमाणे कुठली सीट लवकरच रिकामी होणार आहे, याकडे लक्ष देऊन चपळाईने ती जागा बळकावी लागते. अनुभवाने यात सराईतपणा येतो. अर्ध्या प्रवासानंतर अशी सीट मिळाली तर होणारा आनंद अवर्णनीय असतो. अशा वेळी पाच-दहा मिनिटांची डुलकीही फ्रेश होण्यासाठी पुरेशी असते. यदाकदाचित संपूर्ण प्रवासात क्षणभराच्या डुलकीसाठी सीट मिळाली नाही तर चिडचिडपणा व्हायचा,  डोके भणभणायला लागायचे. ऑफिसात शिरल्यावर काम सुरू करायला उत्साह नसायचा. 

मी सिटी बसने प्रवास करतो, याचे अनेकांना आश्चर्य वाटते. बस स्टॉपवर पाहून अनेकदा ओळखीचे लोक लिफ्ट देऊ पाहतात. घरी दुचाकी, चारचाकी आहे, तरी मला सिटीबसनेच प्रवास करायला आवडते, आणि तेसुद्धा दुपारच्या झोपेच्या सुखासाठी… निद्रादेवीच्या आराधनेच्या माझ्या या हव्यासापायी अनेकदा काही गंमतीजमतीही व्हायच्या. घरासमोरच्या बसस्टॉपवर बसची वाट पाहत असताना शेजाऱ्याची चारचाकी माझ्यासमोर येऊन थांबली. तो म्हणाला, ‘शिवाजीनगरला चाललोय, चला माझ्याबरोबर.’ मी चक्क नाही म्हणालो. मला पीएमटी बसनेच जायचे आहे, असे मी त्याला सांगितले. त्याच्यासोबत गेलो असतो तर लवकर पोहोचलो असतो, पण दुपारच्या झोपेचे खोबरे झाले असते!

माझ्या या हट्टाहासाची कल्पना असलेल्या दुसऱ्या एका स्नेहाने कारमध्येच झोपण्याचा सल्ला दिला, तो अव्यवहार्य म्हणून मी नाकारला होता. स्नेही कार चालवत असताना त्याच्या शेजारच्या किंवा मागच्या सीटवर स्वस्थ झोप येणे शक्य झाले नसते! आणि समजा डोळा लागला तरी काही मिनिटांतच आम्ही पुण्याला पोहोचलो असतो.  

हा, मात्र कारमध्ये असतानासुद्धा बससारखेच आरामात सिएस्ताचा लाभ घेण्याचे अनुभवाने मी शिकलो. अलिकडच्या काळात ‘बिझिनेस’ ही अत्यंत आकर्षक आणि मोहदायी बीट माझ्या वाट्याला आली. या बिटच्या कार्यभागानुसार चाकण औद्योगिक क्षेत्रात व इतरत्र उद्योगकंपन्यांना भेटी द्याव्या लागायच्या, दुपारच्या पेयपान आणि जेवणानंतर तेथून दुपारी पुण्याला परतावे लागे. विशेष म्हणजे बहुतांश वेळेस मला एकट्याला प्रवासाला स्वतंत्र टॅक्सी असायची. अशा वेळी मागच्या सीटवर अगदी कमरेला सीट बेल्ट लावून त्या वातानुकूलित कारमध्ये मस्तपैकी सिएस्ता व्हायची. शिवाजीनगरला न.ता. वाडीला पोहोचल्यावर ड्रायव्हरने आवाज दिल्यावरच निद्राभंग व्हायचा. पण तोवर मस्तपैकी झोप होऊन अगदी फ्रेश वाटायचे. 

प्रवास करताना निद्रासुख घेण्याचे प्रसंग पुण्यातून चिंचवडला रात्री उशिरा परतताना अनेकदा आले. असेच एकदा रात्री निगडी बस स्टॉपवर उतरून मी चालत होतो, तो मागच्या एका कारमधून हॉर्न ऐकू आला, चिडून मी रस्त्याच्या आणखी कडेने चालू लागलो, तरी हॉर्नचा आवाज वाढतच होता. शेवटी ती कार अगदी मला खेटून उभी राहिली. आणि सुहासने, माझ्या शेजाऱ्याने गाडीत बसायला सांगितले.

त्या रात्रीच्या वेळी घरापासून लांब असलेल्या रस्त्यावरून चालताना माझ्या गोंधळलेल्या स्थितीवरून बहुधा सुहासला आणि त्याच्या बायकोला काहीतरी अंदाज आला असावा. गाडीत बसल्यावर शेवटी त्यांना सांगावेच लागले की, बसमध्ये डुलकी लागल्यामुळे चिंचवड कधी मागे पडले ते कळलेच नाही आणि कंडक्टरने निगडीला शेवटच्या बस स्टॉपवर जागे! त्या स्पष्टीकरणावर गाडीत मोठा हास्यकल्लोळ झाला! सुहासच्या मुलाला – आरुषला - मात्र मी बसमध्ये असा झोपलोच कसा हा प्रश्न पडला!  

या घटनेपासून पुणे मनपा बस स्टॅन्डवरून रात्री उशिरा घरी येताना चिंचवडमार्गे देहूरोड मुक्कामी बसने कधीही यायचे नाही, असा कानाला खडा लावला. नाहीतर या तीर्थक्षेत्री रात्री मुक्काम करावा लागला असता !

असेच एकदा रात्री साडेनऊला शिवाजीनगरहून चिंचवडमार्गे जाणारी लोणावळा लोकल पकडली. गर्दी नव्हतीच. लोकलने वेग घेतला अन रात्रीच्या थंड वाऱ्यात कधी डोळा लागला ते समजलेच नाही. पिंपरी रेल्वेस्टेशनवर लोकांची गडबड ऐकली अन खाड्कन जागा झालो. नाही तर रात्री अकराच्या आसपास लोणावळा गाठले असते. त्यानंतर लोणावळा लोकलने कधी प्रवास केला नाही.

करोनामुळे ऑफिस सुटून ‘वर्क फ्रॉम होम’ करताना तर सिएस्ता अत्यंत गरजेची झाली आहे आणि त्यासाठी थोडा वेळ अधिक खर्चिला जात आहे. त्या दिवशी कुणी एकाने झूम मिटिंगसाठी दुपारची तीन ही वेळ निवडली, तेव्हा तिडीक आली होती. मात्र झूम मिटिंगसाठी परदेशांतील लोकही असणार म्हणून बहुतांश लोकांना सोयीस्कर अशी ही वेळ, असे कळल्यावर मी शांत झालो.   

पत्रकारितेच्या व्यवसायात ज्या काही थोड्याबहुत चांगल्या गोष्टी उपभोगता आल्या, त्यापैकी या सिएस्ताला मी अगदी वरच्या क्रमांकाची जागा देईल. इंग्रजी पत्रकारितेतील एक पत्रकार म्हणून बऱ्यापैकी मासिक वेतन आणि इतरांना न मिळणाऱ्या कैक सुविधा मिळत असतानाच सिएस्तासारख्या स्वर्गसुखाचा आनंद दुसऱ्या कुठल्याही व्यवसायात भोगता आला असता, असे वाटत नाही. सिएस्ताला ‘होली अवर’ असे का म्हणायचे, हेही आता समजते आहे.      

Friday, April 23, 2021

पंडिता रमाबाई

अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या `समाजस्वास्थ'कार रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या चरित्रावरच्या 'ध्यासपर्व' या डाक्युमेंटरीमधील हा अगदी सुरुवातीचा प्रसंग. पांढरीशुभ्र साडी घातलेली आणि केशसंभार पूर्ण धवल असलेली उतारवयाची एक स्त्री केक कापत आहे असा तो सीन आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनीे बालविधवा असलेल्या गोदूबाईशी विवाह केला आहे आणि त्यांच्या पहिल्या बायकोपासून झालेला मुलगा रघुनाथ खिन्न मनाने हे सगळे पाहतो आहे असे हे दृश्य.

यातली केक कापणारी महिला आहे पंडिता रमाबाई, कारण बालविधवा गोदूबाई ही त्यांच्याच अनाथाश्रमातली मुलगी आणि बालविधवेचा हा पहिला पुनर्विवाह ही भारतातली एक सामाजिक क्रांतीच होती. पंडिता रमाबाईंची भूमिका साकारली आहे विजयाबाई मेहता यांनीं.

मात्र गोदूबाईचे किरकोळ प्रकृतीच्या कर्वे यांच्याशी लग्न ठरवताना रमाबाईंनी अट घातली होती, आपल्या या 'जावईबापूं'नी आधी स्वतःचा विमा उतरवून घ्यावा, उगाच गोदू पुन्हा बालविधवा झाल्यास तिचे हाल व्हायला नको ! गंमतीचा भाग म्हणजे महर्षी कर्वे यांनी पुढे आयुष्याची शंभरी पार केली ! लक्ष्मीबाई आणि रेव्ह. नारायण वामन टिळकांचे चिरंजीव देवदत्त टिळक यांनी `पंडिता रमाबाई - महाराष्ट्राची तेजस्विनी' या चरित्रात हा प्रसंग रेखाटला आहे.

एक अत्यंत तेजस्वी व्यक्तिमत्व असलेल्या पंडिता रमाबाई यांचा २३ एप्रिल हा जन्मदिन.

मूळच्या कर्नाटकातल्या असलेल्या रमाबाई डोंगरे यांची महाराष्ट्र हीच कर्मभूमी. महाराष्ट्रातील काही अगदी मोजक्या म्हणजे एका हाताच्या बोटांवर मोजता येतील अशा काही विदुषींमध्ये मी त्यांचा समावेश करील. महाराष्ट्र ही तशी संशोधक आणि विद्वानांची खाण. `महाराष्ट्र चरित्रकोश : इ. स. १८०० ते इ.स. २०००’ या माझ्या चरित्रकोशात मी अनेक विद्वानांची अल्पचरित्रे दिली आहे, त्यात विदुषी म्हणता येईल अशी फारच कमी व्यक्तिमत्वे मला आढळली.

इरावती कर्वे, दुर्गाबाई देशमुख (सी. डी देशमुख यांच्या पत्नी), दुर्गा भागवत अशा त्या नावे घेण्यासारख्या महाराष्ट्रातील इतर काही विदुषी. यांमध्ये पंडिता रमाबाईंचे फार वरचे स्थान आहे.

पंडिता रमाबाई म्हटले कि ब्राह्मण समाजातून ख्रिस्ती होऊन या धर्माचा प्रचार करणारी महिला असेच चित्र समोर येते. पण पंडिता रमाबाई यांनी याहून खूप काही केले आहे. काँग्रेसच्या १८८०च्या दशकात सुरुवातीच्या अधिवेशनात हजेरी लावणाऱ्या मोजक्या महिलांमध्ये त्या होत्या, हंटर शिक्षण आयोगासमोर त्यांनी भारतीय महिलांच्या शिक्षणाच्या गरजेची जोरदार बाजू मांडली. बालविधवा, परित्यक्त्या आणि अनाथ मुलींसाठी त्यांनी किती कार्य केले हेसुद्धा समजून घेतले पाहिजे. त्या तरुण वयात विधवा झाल्या, शिवाय त्या ख्रिस्ती मिशनरी, म्हणून पुण्यातील आघाडीच्या दैनिकात त्यांची 'रेव्हरांडा' असा द्विअर्थी शब्द वापरुन म्हणून संभावना, हेटाळणी केली गेली, जसे मिशनरींच्या जवळ गेल्याने महात्मा फुले यांना 'रेव्हरंड फुले' असे म्हणले गेले.

काम करणाऱ्या, घराबाहेर पडणाऱ्या महिलांसाठी नऊवारी साडी ऐवजी सहावारी गोल साडी चांगली, असा प्रचार करणाऱ्या पंडिता रमाबाई. त्यांची मुलगी मनोरमा मेधावी यांनी केडगावात अंधांसाठी भारतातील पहिली शाळा सुरु केली आणि तिथे ब्रेल लिपी शिकवली. केडगावातून पुण्यात डेक्कन कॉलेजात चारचाकी वाहन चालवत येणारी मनोरमा मेधावी महाराष्ट्रातील किंवा पुण्यातील बहुधा पहिली महिला. नंतरच्या काळात इरावती कर्वे यांनी पुण्यातील पेठेंत स्कुटरवरुन प्रवास करत असाच विक्रम केला होता.

पंडिता रमाबाई यांनी मराठी आणि इंग्रजी भाषांत विविध विषयांवर अनेक पुस्तके लिहिली, बायबलचे मूळ हिब्रू आणि ग्रीक भाषांतून भाषांतर करणाऱ्या त्या जगातील पहिला महिला. आजही बायबलचे मराठीत भाषांतर करणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. पंडिता रमाबाईंवर आजवर मराठी, इंग्रजी आणि इतर भाषांत जितकी चरित्रे आणि पुस्तके लिहिली गेली आणि आजही लिहिली जाताहेत, तितकी पुस्तके महाराष्ट्रातील कुणाही महिलेवर आतापर्यंत लिहिली गेलेली नाहीत.

ज्योत्स्ना देवधर (पॉप्युलर प्रकाशन १९९०) यांचे `रमाबाई' , सिसिलिया कार्व्हालो यांचे 'महाराष्ट्राचे शिल्पकार: पंडिता रमाबाई' (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (२००७) आणि अनुपमा निरंजन उजगरे यांचे `पंडिता रमाबाई' (साहित्य अकादमी २०११) ही अगदी अलिकडची त्यांची प्रसिद्ध झालेली काही चरित्रे.

पंडिता रमाबाईंनी आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात अनेक वादळांना तोंड दिले. त्यांचे एकूण व्यक्तिमत्व कुणालाही अचंबित करेल असेच आहे. 'ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' (2003 ) या माझ्या पुस्तकाची सुरुवातच या विदुषी आणि समाजसुधारक व्यक्तिमत्वाच्या प्रकरणाने होते.

या थोर व्यक्तिमत्वाला त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन !

Camil Parkhe 23 April 2021

Thursday, April 8, 2021

काही घटना कायम आठवणीत राहतात. त्याचे कारण त्यातील महत्त्वाच्या व्यक्ती

 काही घटना अगदी काही क्षणांच्या, किंवा एक-दोन तासांच्या असतात, पण कायम आठवणीत राहतात. त्याचे कारण त्यातील महत्त्वाच्या व्यक्ती

पडघम - माध्यमनामा
कामिल पारखे

नारायण सुर्वे, एन.डी. पाटील, जयंत नारळीकर, अण्णा हजारे, बा. भ. बोरकर, सय्यदभाई, मोहन धारिया आणि किरण बेदी
  • Tue , 06 April 2021

“नारायण सुर्वे सपत्नीक पणजीला आले आहेत, अल्तिनोला गेस्ट हाऊसवर उतरले आहेत. त्यांना ‘गोवादर्शन’ घडवून आणशील का?”

एक दिवस गोव्यातल्या महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी अनुराधा आठवले यांचा निरोप आला. १९८०च्या दशकाच्या सुरुवातीची ही घटना असावी. लँडलाईन फोन दुर्मीळ आणि मोबाईलची संकल्पनाही अस्तित्वात नसलेल्या त्या काळात हा निरोप माझ्यापर्यंत कसा आला आता आठवत नाही. त्या वेळी मी पणजीतल्या ‘नवहिंद टाइम्स’ या दैनिकात नवशिखा बातमीदार होतो. गंमतीची बाब म्हणजे अनुराधा आठवले या पणजीतल्याच ‘गोमंतक’ या मराठी दैनिकाचे संपादक असलेल्या नारायण आठवले यांच्या पत्नी. त्यामुळे इंग्रजी दैनिकात काम करणाऱ्या माझ्यासारख्या नवख्या बातमीदाराकडे या कामगिरीसाठी अनुराधाबाईंनी विचारणा करावी, याचे आश्चर्य वाटले. आमचे वृत्तसंपादक एम. एम. मुदलीयार या कामगिरीसाठी परवानगी देतील, याची खात्री असल्याने मीही लगेच होकार कळवला.

महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्राबाहेर ‘महाराष्ट्र परिचय केंद्रे’ चालवली जातात. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा इतर राज्यांतील लोकांना परिचय व्हावा, या हेतूने या केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम राबवले जातात. महाराष्ट्रातील साहित्यिकांची व्याख्याने आयोजित करणे हा त्यापैकीच एक. त्याआधी महाराष्ट्र परिचय केंद्राने पु.ल. देशपांडे यांची तीन व्याख्याने आयोजित केली होती. साहित्यरसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी माझी अनुराधा आठवले यांच्याशी पहिल्यांदा गाठभेट झाली होती.

ठरल्याप्रमाणे सकाळीच मी अल्तिनोवर गेस्ट हाऊसवर गेलो, तेव्हा कवीमहाशय आणि त्यांच्या पत्नी कृष्णाबाई तयारच होत्या. सुर्वे यांचे ‘माझे विद्यापीठ’ आणि ‘ऐसा गा मी ब्रह्म’ हे दोन्ही काव्यसंग्रह माझ्याकडे होते.  त्या दोन दिवसांत मी सुर्वे दाम्पत्याला गोव्याच्या काही प्रसिद्ध ठिकाणी घेऊन गेलो.  

आठवले यांच्यामुळेच रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एन. डी. पाटील आणि त्यांच्या पत्नी यांना कारमधून गोव्यात फिरवून आणण्याची अशीच एक संधी मिळाली. आता नारायण सुर्वे किंवा एन. डी. पाटील यांच्याशी काय गप्पा झाल्या, ते काही आठवत नाही, पण त्या भेटींची स्मरणचित्रे अजूनही ताजी आहेत. 

असेच एकदा कुठल्याशा एका साहित्य संमेलनासाठी पणजीहून आम्ही काही बातमीदार कारने निघालो होतो. बहुधा रणजित देसाई उद्घाटक असलेले म्हापसा येथील ते कोकणी साहित्य संमेलन असावे. संमेलनासाठी पत्रकारांना घेऊन जाणाऱ्या आयोजकांनी आमच्या गाडीत एका महनीय पाहुण्यालाही घेतले होते. ही व्यक्ती होती मानेपर्यंत रुळणारे केस असणारे आणि खांद्यावर घडी केलेली शाल टाकलेले ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकर!

‘बाकीबाब बोरकर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्या कवीच्या कविता आपण शाळेत शिकलो, तो कवी आज आपल्यासोबत बसून गप्पा मारतो आहे, हे माझ्यासारख्या तरुण बातमीदारासाठी अविश्वसनीय होते. त्याआधी काही काळ बाकीबाब बातम्यांच्या केंद्रस्थानी आले होते, ते दुसऱ्या एका कारणाने. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची त्यांनी लढवलेली निवडणूक अटीतटीची आणि व्यक्तीगत आणि प्रादेशिक पातळीवर तेढ आणि कटुता निर्माण करणारी झाली होती. त्या निवडणुकीत बोरकरांचा पराभव करून गजमल माळी मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष झाले होते. बाकीबाब यांना आणि अनेकांना हा पराभव जिव्हारी लागला होता. त्यानंतर बाकिबाब ‘कोकणीवादी’ बनले असे म्हटले गेले. त्या कारच्या अर्ध्या तासांच्या प्रवासात मी बाकीबाब यांच्याशी एक शब्दही बोललो नव्हतो. माझ्याकडे त्यांच्याशी बोलण्यासारखे काही नव्हतेच. या ज्येष्ठ कविवर्यांचा आपल्याला काही क्षणांचा सहवास लाभला, हे मात्र आजही मी विसरलेलो नाही.

पणजीला कंपाल येथे कला अकादमीचे भव्य, देखणे संकुल उभारले, त्यानंतर लवकरच तेथे गोवा, दमण आणि दीव सरकारच्या सांस्कृतिक खात्यातर्फे एक नाट्यक्षेत्रातील लोकांसाठी चार दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. बाकीचे बातमीदार उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजर राहून नंतर आपल्या नेहमीच्या कामाला लागले होते. बातमीदार म्हणून मला मात्र त्या चारही दिवसांच्या कार्यशाळेला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. रंगभूमीविषयी मला आताही फारसे काही माहीत नाही, तेव्हा तर काही माहिती असणे शक्यच नव्हते. पण तरीही आपण रंगभूमीवरील काही मोठ्या व्यक्तींबरोबर वावरत आहोत, याची मला लगेचच जाणीव झाली होती.  

रंगभूमीवर मोठे योगदान आणि वावर असलेल्या त्या व्यक्तींपैकी केवळ एकच नाव मला तेव्हा परिचित होते. ते म्हणजे रोहिणी हट्टंगडी. सर रिचर्ड अटनबरो यांचा ‘गांधी’ हा चित्रपट त्या वेळी नुकताच प्रदर्शित झाला होता. गोव्यात तोपर्यंत टेलिव्हिजनचा जमाना सुरू झालेला नव्हता. ‘नवहिंद टाइम्स’चे संपादक बिक्रम व्होरा यांनी आमच्या दैनिकाच्या ऑफिसात एका चौकोनी बॉक्सवर तो कृष्णधवल चित्रपट सर्वांना दाखवला होता. धावती चित्रे दाखवणारा आणि आवाज असणारा चौकोनी बॉक्स असलेला व्हिडिओ सेट पाहण्याची आम्हा अनेकांची ती पहिलीच वेळ. या ‘गांधी’ चित्रपटात कस्तुरबा गांधी यांची भूमिका केल्याने रोहिणी हट्टंगडी या एकदम प्रकाशझोतात आल्या होत्या. त्यांचे पती जयदेव हट्टंगडीसुद्धा या कार्यशाळेला उपस्थित होते.

पहिल्याच दिवशी इथे मराठी रंगभूमीवरील दादा मंडळी आहेत, हे लक्षात आले होते. त्यापैकी एक होत्या विजया मेहता, दुसरे होते महेश एलकुंचवार. महाराष्ट्रातील विविध शहरांतील ज्येष्ठ रंगकर्मीही होते, पण इतरांची नावे मला आज आठवत नाहीत.

कार्यशाळेत चर्चा होत असताना अधूनमधून एक ज्येष्ठ व्यक्ती बोलायला उभी राहायची, तेव्हा इतर सर्व मंडळी त्यांना अदबीने ऐकून घेत असत. नंतर समजले की, ते मराठी रंगभूमीवरील खूप ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आहे, त्यांचे नाव दामू केंकरे. मूळ गोव्याचे असलेल्या केंकरे यांनीच या कार्यशाळेच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती, असे नंतर समजले. 

त्या चार दिवसांच्या कार्यशाळेवर नंतर मी काय बातमी वा वार्तापत्र लिहिले ते आता आठवत नाही. मी स्वतः त्या वेळी नुकतीच विशी ओलांडली होती आणि रोहिणी आणि जयदेव हट्टंगडी, निळ्या जिन्सवर इन-शर्ट असणारे महेश एलकुंचवार हे लोकसुद्धा त्या वेळी ऐन तरुणाईतच होते. मात्र वास्तुशिल्पकार चार्ल्स कोरिया अफ़ॉन्सो यांनी डिझाईन केलेल्या कला अकादमीच्या त्या नव्या संकुलातील अम्फी थिएटरमध्ये, खुल्या जागेत, हिरवळीवर झालेल्या त्या चर्चांची चित्रे आजही माझ्या नजरेसमोर आहेत. त्यानंतर एलकुंचवार यांची ‘गार्बो’ आणि इतर काही नाटकांची पुस्तके मी आवर्जून विकत घेऊन संग्रही ठेवली होती.    

गोव्यात १९८३ साली राष्ट्रकुलातील ३९ देशांतील प्रमुखांची - राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान- यांची अनौपचारिक बैठक (कॉमनवेल्थ हेडस ऑफ गव्हर्नमेंट मिटिंग - चोगम रिट्रीट) पार पाडली, तेव्हा गोव्यातील वाहतूक नियोजनाची जबाबदारी पोलीस उपअधीक्षक (वाहतूक) किरण बेदी यांच्याकडे होती. बेदी या भारतीय पोलीस दलातील (आयपीएस) पहिल्या महिला अधिकारी. ‘नवहिंद टाइम्स’चा क्राईम रिपोर्टर म्हणून बेदी यांच्याशी त्या काळात जवळपास रोजच संबंध आला. या काळात वॉकी-टॉकीचा अवजड बॉक्स असलेल्या जिप्सी जीपमधून त्यांच्यासह मी दाबोळी विमानतळ ते आग्वाद ताज व्हिलेजपर्यंत रंगीत तालमीसाठी फिरायचो. एक बातमी देण्यावरून आमच्यात एकदा खडाजंगीही झाली होती. मात्र पुढे देशभर नाव कमावलेल्या या पोलीस अधिकाऱ्याशी बातमीदार म्हणून एकेकाळी अगदी वैयक्तिक  संबंध होते, याचा आज मागे वळून पाहताना आनंद वाटतो.

आपल्या ‘भारत जोडो’ या अभियानाच्या निमित्ताने गोव्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या दौऱ्याचे वार्तांकन केले, नोबेल पारितोषक विजेत्या आणि भारतरत्न किताबाच्या मानकरी मदर तेरेसा यांच्या गोवा दौऱ्यात त्यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो. भारताच्या दहा दिवसांच्या पाळकीय दौऱ्यावर असताना पोप जॉन पॉल दुसरे १९८६मध्ये पणजीला आले होते. तेव्हा बुलेटप्रूफ पोपमोबाईलमधून गर्दीतून हिंडत, उजवा हात उंचावून क्रुसाची खूण करून भाविकांना आशीर्वाद देताना त्यांना मी अगदी जवळून पाहिले. 

अशीच गोष्ट सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्याबाबाबत. गोवा सोडून पुण्यात ‘इंडियन एक्सप्रेस’ला रुजू झाल्यानंतर हजारे यांच्या राळेगण सिद्धीला अनेकदा गेलो, तेथे काही दिवस मुक्कामही केला. अण्णा पुण्यात शनिवार पेठेतल्या राष्ट्रभाषा भवनात राहायला आल्यावर हमखास आमच्या भेटी व्हायच्या, पत्रव्यवहारही असायचा. नंतर या भेटी विरळ होत गेल्या, गेली कित्येक वर्षे तर प्रत्यक्ष भेट किंवा फोनवरही संभाषण नाही. मात्र राळेगण आणि हजारे यांच्याशी असलेले जुने संबंध आजही विसरलेलो नाही. आम्हां दोघांचे कृष्णधवल, काही रंगीत फोटो आणि काही पत्रव्यवहार आजही मी जपून ठेवले आहेत.  

औरंगाबादला ‘लोकमत टाइम्स’ला असताना तेथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे बिट माझ्याकडे होते. या खंडपीठातील ज्येष्ठ वकील नरेंद्र चपळगावकर माझे सर्वांत महत्त्वाचे सोर्स. त्यांनी इंग्रजीत डिक्टेट केलेली खटल्याची ब्रिफिंग मी अगदी जशीच्या बातमीत वापरायचो, इतकी त्यांची वैचारिक स्पष्टता आणि अचूकता असायची. हे चपळगावकर नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले, त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. माझ्या बातमीदारीतील कारकिर्दीतील न्यायमूर्ती चपळगावकर हे एक अत्यंत आदरणीय सोर्स आणि व्यक्ती आहेत.

पुण्यात बातमीदारी करताना कुटुंबनियोजनाच्या चळवळीत रघुनाथ धोंडो कर्वे यांना मदतीचा हात देणाऱ्या रँग्लर परांजपे यांच्या कन्या शकुंतला परांजपे यांच्याशी त्यांच्या अखेरच्या काळात म्हणजे १९९०च्या सुरुवातीला माझे जवळकीचे संबंध निर्माण झाले. मिठाईचा डबा हातात घेऊन मांजरांना खेळवत, पनामा सिगारेट पित, निरागस हसत माझ्याशी गप्पा मारणाऱ्या लेखिका, माजी राज्यसभा सभासद, पद्मविभूषण सन्मानित शकुंतलाबाई आजही माझ्या नजरेसमोर आहेत. 

काही घटना अगदी काही क्षणांच्या, मिनिटांच्या किंवा एक-दोन तासांच्याच असतात, पण कायम आठवणीत राहतात. त्याचे कारण म्हणजे त्यातील महत्त्वाच्या व्यक्ती. पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी शिथिल करून निवडणुका जाहीर केल्या तेव्हाची ही घटना. तुरुंगातून राजकीय नेत्यांच्या सुटका झाल्यावर निवडणूक प्रचारावर येणाऱ्या नेत्यांचे देशभर उत्साहाने स्वागत केले जात होते. इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असूनही आणीबाणीला विरोध करून तुरुंगात जाणारे, तरुण तुर्कांपैकी एक असणारे मोहन धारिया श्रीरामपूरला आले, तेव्हा झालेल्या त्यांच्या जंगी स्वागताला आणि नंतर आझाद मैदानावर झालेल्या सभेला मी हजर होतो. त्या वेळी मी नुकतीच अकरावीची परीक्षा दिली होती. त्यानंतर १२ वर्षांनी ‘इंडियन एक्सप्रेस’चा पुण्यातील बातमीदार म्हणून मी मोहन धारिया यांना भेटलो, तेव्हा पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कुठल्याशा निर्णयाला विरोध करण्यासाठी गोळीबार मैदानापाशी अण्णा बेमुदत उपोषणाला बसलेले होते.

पुण्यातील ‘आयुका’चे संचालक असलेले डॉ. जयंत नारळीकरांची खूप वर्षांपूर्वी ‘इंडियन एक्सप्रेस’च्या संगीता जैन-जहागिरदार आणि मी मुलाखत घेतली. त्या वेळी मुलाखतीस वेळेवर यावे, नारळीकर वक्तशीरपणाबाबत किती जागरूक याविषयी त्यांच्या सचिव महिलेने वारंवार बजावले होते, ते आजही आठवते. एक तास चाललेल्या या मुलाखतीत नारळीकर यांनी विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज त्यांना जगातील कुठल्याही व्यक्तीचा शोधनिबंध ‘इलेक्ट्रॉनिक मेल’मुळे काही क्षणात उपलब्ध होतो, असे म्हटले तेव्हा मला काहीच अर्थबोध झाला नव्हता. ते साल होते १९९१ आणि सर्व क्षेत्रांत इंटरनेटचा वापर होण्यासाठी आणखी काही वर्षे जाणार होते. त्या वेळी माझ्या अगदी डोक्यावरून गेलेल्या ‘ई-मेल’शिवाय आज कुणाचे चालू शकणार आहे का? छापलेल्या मुलाखतीची वृत्तपत्रांतील कात्रणे मी डॉ. नारळीकरांना एक छोटेशा पत्रासह पोस्टाने पाठवली, तेव्हा उलटटपाली मला पाठवलेल्या माझ्या त्याच टाईप केलेल्या पत्रावर नारळीकरांनी दोन ओळींत धन्यवाद दिले होते. नारळीकरांच्या स्वाक्षरीचा तो ३० वर्षांपूर्वीचा तो कागद आजही माझ्या संग्रही आहे. काही महिन्यांपूर्वी डॉ. नारळीकरांची मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर निवड झाल्याची बातमी ऐकली, तेव्हा त्या भेटीची चित्रफित नजरेसमोर  झळकली.

पुणे जिल्ह्यातल्या आंबेठाण गावातून शेतकरी संघटनेच्या चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या शरद जोशींना भेटण्यासाठी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या अभय वैद्यसह मी १९९१ साली गेलो होतो, ती भेट विसरणे तर अशक्य. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या नावावर निवडणूक प्रचार करणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या पक्षांविरुद्ध शरद जोशी यांनी त्या खेड्यात राहून जोरदार मोहीम राबवली होती. काही काळानंतर धर्माच्या नावाने निवडणुकीत मते मागितल्याबद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुंबईचे माजी महापौर आमदार रमेश प्रभू यांच्यांवर निवडणूक आयोगाने सहा वर्षांसाठी मतदान करण्यावर आणि निवडणुकीत भाग घेण्यावर बंदी आणली होती. स्वतः शरद जोशीच नंतर भाजपचे खासदार बनले, पण तो वेगळा विषय आहे.   

मुस्लीम समाजात सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी पुण्यातील सय्यदभाई यांनी केलेल्या कामाबाबत दोन-तीन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी सरकारने त्यांना पद्मश्री प्रदान केली. त्या वेळी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात प्रसिद्ध शाह बानो प्रकरणात सय्यदभाईंनी केलेल्या चळवळीचा बहुतेकांना माहितीही नव्हती. त्या काळात म्हणजे १९९०ला ‘इंडियन एक्सप्रेस’साठी मी त्यांची मुलाखत घेतली होती, हे या पदमश्री पुरस्काराच्या निमित्ताने आठवले. याच दरम्यान सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, बोहरी समाजातील कार्यकर्ते ताहेर पूनावाला यांच्याही मुलाखती ‘इंडियन एक्सप्रेस’साठी घेतल्या होत्या.

सत्ताधारी आणि इतर राजकिय नेत्यांशी आम्हा पत्रकारांचा नेहमीच संबंध येतो. मात्र समाजमनावर राज्य करणाऱ्यांमध्ये, समाजाला प्रेरित करणारी सामान्यांमधील असामान्यजनही असतात. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी मृतदेहाचा तुटवडा पडतो, हे लक्षात आल्यावर आपल्या वृद्धापकाळी देहदानाची चळवळ राबवणारे पुण्यातील ग. म. सोहोनी अशांपैकी एक. त्यांच्यावरही मी अनेक बातम्या केल्या. समाजवादी नेते नानासाहेब गोरे आणि उद्योगपती शंतनुराव किर्लोस्करांनी स्वतः देहदानाच्या अर्जावर सह्या करून या सोहोनींना नैतिक पाठबळ दिले. नानासाहेबांची देहदानाची इच्छा त्यांच्या अमेरिकास्थित मुलीच्या प्रखर विरोधामुळे साकार होऊ शकली नाही, हा भाग वेगळा.  

गोवा आणि महाराष्ट्रातील माझ्या पत्रकारितेच्या व्यवसायातील या काही आठवणी. ३०-४० वर्षांच्या कालखंडातील घटना आणि व्यक्तींबद्दलच्या या आठवणी काही नव्या, ताज्या घडामोडींमुळे परत ताज्यातवान्या होतात. काळाचा महिमा असा की, त्याबद्दल आता खेद किंवा खंत नसते, क्वचित त्या घटनेवरून स्वतःशीच हसणे होते. एकतर त्या घटनेत आपल्यासह सहभागी असणारे आता आपल्याशी संपर्कात नसतात किंवा काळाच्या पडद्याआड गेलेले असतात. भूतकाळातल्या या आठवणींना ऐतिहासिक मूल्यही असू शकेल, असे म्हणणे आत्मप्रौढीचे ठरू शकते. या घटनांना आणि व्यक्तींना अशा प्रकारे उजळणी देताना त्या काळात पुन्हा वावरल्याची आणि त्या व्यक्तींना पुन्हा एकदा भेटल्याची अनुभूती येते, हे मात्र खरे! 


Friday, March 19, 2021

गेल्या पाच दशकांतील सार्वत्रिक निवडणुकांच्या काही आठवणी

गेल्या पाच दशकांतील सार्वत्रिक निवडणुकांच्या काही आठवणी पडघम - देशकारण कामिल पारखे इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, काँग्रेस आणि भाजप Sat , 06 April 2019 पडघमदेशकारणलोकशाहीनिवडणुकाइंदिरा गांधीराजीव गांधीपी. व्ही. नरसिंहरावअटल बिहारी वाजपेयीबाळासाहेब ठाकरेशरद पवारSharad Pawar देशातील सार्वत्रिक निवडणुकांचा मी सर्वप्रथम अनुभव घेतला तो बांगलादेश मुक्तीनंतर पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९७१ साली निवडणुका लढवल्या तेव्हा. कोपरगाव लोकसभा मतदारसंघात डाव्या पक्षाच्या पी. बी. कडू यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे एकनाथ विठठलराव विखे उभे होते. अहमदनगर जिल्हा त्या काळात डाव्यांचा बालेकिल्ला होता. सुरुवातीला नवखे उमेदवार असलेल्या विखेंनी अखेरीस निवडणुकीत बाजी मारली. याचे कारण इंदिरांच्या नेतृत्वाखाली गाय-वासरू चिन्ह असलेल्या नवकाँग्रेस पक्षानं संपूर्ण देशात संघटना काँग्रेसच्या बैलजोडीला, जनसंघाच्या पणतीला, डाव्यांच्या लाल बावट्याला आणि इतर पक्षांना निवडणुकीत धूळ चारली होती. ‘गाय-वासरू नका विसरू’ ही घोषणा अजूनही आठवते. या बाळासाहेब विखेंनी नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील पाच दशके आपली मांड व्यवस्थित बसवली. त्यांनतर १९७२ ला विधानसभा निवडणुकीत श्रीरामपूर मतदारसंघात अशोकनगर साखर कारखान्याचे चेअरमन असलेल्या बंडखोर उमेदवार भाऊसाहेब गलांडे पाटलांना गोविंदराव आदिक या तरुण वकिलाने कसे हरवले हे मी जवळून पाहिले. या दोन निवडणुकांच्यावेळी मी सहावी-सातवीला होतो. निवडणुकांत कुठले मुद्दे महत्त्वाचे ठरतात, कुंपणावरचे मतदार अखेरच्या क्षणी निवडणुकीचे कौल कसे ठरवतात, याची आमच्या घरात असलेल्या पाच मतांवरून अंदाज आला. मतदानाच्या आदल्या रात्री मतांचा भाव फुटे आणि पक्षांचे नेते एखाद्या स्थानिक कार्यकर्त्याला घेऊन घराघरांत फिरत. घरटी किती मते आहेत, याची कार्यकर्त्यांना माहिती असे. तेव्हा पाच-दहा रुपयांच्या नोटा मोजत असलेल्या कार्यकर्त्यांकडे आशाळभूत नजरेने पाहणाऱ्या गरीब मतदारांचे चेहरे आजही माझ्या नजरेसमोर आहेत. आणीबाणीनंतर १९७७ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी मी कराडला अकरावीला होतो. जनता पक्षाच्या प्रचाराला मी झोकून घेतले होते. सातारा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार आणि केंद्रिय मंत्री यशवंतराव चव्हाण आणि कराड मतदारसंघात प्रेमलाकाकी चव्हाण (पृथ्वीराज चव्हाण यांच्या मातोश्री) यांच्या विरोधात आमचा जनता पक्षाच्या वतीने प्रचार होता. मतदानानंतर भल्या पहाटे कराडहून एका ट्रकने आम्ही कार्यकर्ते साताऱ्याला मतमोजणीसाठी गेलो होतो. त्या दोन मतदारसंघातील मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालू होती. रात्री दोनच्या सुमारास कुणीतरी सांगितले की, रेडिओ बीबीसीने जाहीर केले की, पंतप्रधान इंदिरा गांधी रायबरेलीतून निवडणूक हरल्या आहेत. ती बातमी ऐकून त्या मतदान मोजणी मंडपातील वातावरणच बदलून गेले. यशवंतराव आणि प्रेमलाकाकी प्रचंड मताधिक्याने निवडून येऊनसुद्धा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुतक होते, तर आम्हा जनता पार्टीच्या लोकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. १९८० च्या सार्वत्रिक निवडणुकीतील एक अविस्मरणीय घटना आठवते. सत्ता गमावलेल्या इंदिरा गांधी डिसेंबर महिन्यात गोव्याच्या निवडणूक दौऱ्यावर होत्या. पणजीत गाडीतून उतरून इंदिराजी लोकांना अभिवादन करताना आणि मांडवी हॉटेलमध्ये शिरत असताना मी त्यांच्यापासून अगदी काही फुटांच्या अंतरावर उभा होतो. नंतर अर्ध्या तासानंतर मांडवीच्या तीरावर कम्पाल ग्राऊंडवर त्यांचे भाषणं मी ऐकले. त्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेस पक्ष प्रचंड मताने देशात सत्तेवर आला. आणीबाणीमुळे खूप बदनाम झालेल्या इंदिरा गांधी पुन्हा एकदा इतक्या मताधिक्याने निवडून येतील असे कुणाला वाटले नव्हते. गंमत म्हणजे त्याचवेळी झालेल्या केंद्रशासित प्रदेश असलेल्या गोवा, दमण आणि दीव विधानसभेच्या निवडणुकीत मात्र यशवंतराव चव्हाण आणि देवराज अर्स यांच्या काँग्रेस पक्षाने शशिकला काकोडकरांच्या महाराष्ट्र गोमंतक पक्षाचा पराभव करून सत्ता मिळविली. केंद्रात तर इंदिरा काँग्रेस पक्ष सत्तेवर आला होता. ही मोठी विचित्र राजकीय घटना असल्याने प्रतापसिंग राणे आणि डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांच्या नेतृत्वाखालील गोवा अर्स काँग्रेस पक्षाने सरळसरळ इंदिरा काँग्रेस पक्षात विलीन होण्याचाच निर्णय घेतला. त्यानंतर राणे यांनी गोव्याचे सलग अकरा वर्षे मुख्यमंत्री राहण्याचा विक्रमही केला. १९८१ साली पणजीच्या ‘दि नवहिंद टाइम्स’ या इंग्रजी दैनिकाचा मी बातमीदार बनलो. तेव्हापासून वेगवेगळ्या प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीच्या दैनिकांसाठी आजतागायत म्हणजे चालू २०१९च्या निवडणुकीच्या बातम्या आणि वार्तापत्रे मी लिहीत आहे. (गंमत म्हणजे मला स्वतःला मतदानाचा अधिकार मिळाला तो लग्न झाल्यानंतर माझ्या पायाखालची भिंगरी गायब होऊन मी पिंपरी-चिंचवडला १९९३ ला स्थायिक झाल्यानंतरच!) गोवा, दमण आणि दीव हा केंद्रशासित प्रदेश त्यावेळी एकच जिल्हा होता. लोकसभेचे मात्र आतासारखेच उत्तर आणि दक्षिण गोवा असे दोन मतदारसंघ होते. यापैकी उत्तर गोव्यात हिंदू आणि दक्षिण गोव्यात कॅथोलिक खासदार निवडून येई. (अल्पसंख्याकांना शक्यतो डावलण्याचे धोरण असलेल्या सत्ताधारी भाजपने अल्पमताने का होईना, पण दक्षिण गोव्यातही हिंदूच खासदार राहतील अशी यशस्वी चाल आता राबविली आहे.) गोव्यात नंतरच्या काळात लोकशाही पद्धतीचे आणि पक्षांतर बंदी कायद्याचे धिंडवडे निघायला सुरुवात झाली आणि तो प्रकार आजही चालू आहे. १९९०च्या दशकात काही आठवड्यांसाठी, सहा महिन्यासाठी, एक वर्षांसाठी मुख्यमंत्री होण्यासाठी रांग लागल्यामुळे त्या काळात सक्रिय असलेल्या अनेक आमदारांना मुख्यमंत्री होता आले. गोवा सोडून मी पुण्यात ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये रुजू झालो आणि लगेच १९८९च्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत सहभागी झालो. पंतप्रधान राजीव गांधींची पुण्यात स.प. कॉलेज मैदानावर झालेल्या त्या सभेत त्यावेळी विशीत असलेल्या राहुल गांधींना मी पहिल्यांदा पाहिले. सभेहून परतल्यावर निवासी संपादक प्रकाश कर्दले यांना त्या बातमीचा इन्ट्रो सांगितला, तर ते म्हणाले- “अशा प्रकारची बातमीसाठी “इंडियन एक्सप्रेस’ने आपला बातमीदार सभेसाठी का पाठवायचा? अशी बातमी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) कडून येईलच की!” तोपर्यंत मी अँटी-इस्टॅब्लिशमेंट दैनिकात कधी काम केले नव्हते, याची त्याक्षणी मला जाणीव झाली. या निवडणूक काळात ‘इंडियन एक्सप्रेस’साठी वार्तांकन करण्यासाठी कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्हा मी पिंजून काढला होता. पुण्यात १९८९च्या लोकसभा मतदानपत्रिकांची मोजणी सकाळी सुरू झाली. रात्रीपर्यंत काँग्रेसचे विठ्ठलराव गाडगीळ आणि भाजपचे अण्णा जोशी यांच्यात आघाडीसाठी लढत चालू होती. जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील निवडणूक अधिकारी होते. रात्री साडेदहाला मी कार्यालयात परतून मतांच्या आघाडीच्या आधारे ‘भाजपच्या अण्णा जोशींची निवड निश्चित’ अशी बातमी दिली, त्यानुसार इंडियन एक्सप्रेसच्या पुणे म्हाफुसिल आवृत्तीत ‘भाजपचे अण्णा जोशी जिकंले’ अशा शीर्षकाची बातमी होती. माझ्यानंतर डेडलाइनपूर्वी आमच्या दुसऱ्या बातमीदाराने बदललेल्या मतांच्या आघाडीनुसार बातमी दिली आणि शहर आवृत्तीत बातमीचे बदलेले शीर्षक होते- ‘काँग्रेसचे गाडगीळ जिंकले!’ या निवडणुकीत राजीव गांधी पराभूत झाले आणि विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान झाले. काही महिन्यांत ते सत्तेतून पायउतार झाल्यानंतर चंद्रशेखर पंतप्रधान झाले. या काळात विरोधी पक्षनेते राजीव गांधी पुण्यात आले असता, त्यांच्या पत्रकार परिषदेला मी हजर होतो आणि त्यांच्यांबरोबर हस्तांदोलन करण्याचा योग लाभला. १९९१ मध्ये पुन्हा मध्यावधी निवडणुका जाहीर झाल्या. या काळात बाळासाहेब विखे अहमदनगरमधून अपक्ष म्हणून लढत होते. त्यावेळी प्रचार आटोपून अहमदनगर निवडणूक कार्यालयात विखे परतल्यानंतर त्यांची ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे अभय वैद्य आणि मी मध्यरात्र टळल्यानंतर तासभर मुलाखत घेतली होती. विखेंनी त्या काळात प्रचारात चांगली आघाडी घेतली होती, मात्र एका राष्ट्रीय दुर्घटनेने मतदारांचा कौल ऐनवेळी बदलल्याने विखे हरले आणि यशवंतराव गडाख जिंकले. (विखेंनी मात्र सर्वोच्च न्यायालयात जाऊन गडाखांची ही निवड रद्द ठरवली आणि गडाखांना सहा वर्षे मतदानात आणि निवडणुकीत सहभागी होण्यावर बंदी घालण्यात आली. अशाच प्रकारची नामुष्की देशाच्या इतिहासात केवळ शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना आमदार रमेश प्रभू यांच्यावर धर्माच्या नावावर मते मागण्यामुळे आली होती.) त्याच मे महिन्याच्या एका रात्री झोपायला गेल्यानंतर माझ्या रूममेटने मला गदागदा हलवून जागी केले- ‘राजीव गांधींची हत्या झाली. उठ लवकर!’ मी उठून धावत शिवाजीनगरच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या कार्यालयात गेलो, तेथे टाइम्स समूहाचे सर्व बातमीदार आणि संपादकीय मंडळी कामात गुंतली होती. राजीव यांच्या हत्येआधी निवडणुकाच्या दोन फैरी पार पडल्या होत्या. उरलेल्या निवडणुका काही आठवडे पुढे ढकलण्यात आल्या. योगायोगाने त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते. राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर विजनवासात गेलेले पी. व्ही. नरसिंह राव काँग्रेसाध्यक्ष बनले आणि ‘काँग्रेसला सत्ता मिळाल्यास पंतप्रधानांच्या शर्यतीत आपण असू’ असे पवार यांनी जाहीर केले. बारामती मतदारसंघ प्रसारमाध्यमांसाठी त्यामुळे महत्त्वाचा ठरला. त्यावेळी बीबीसीचे दिल्लीतील प्रतिनिधी सॅम मिलर यांच्यासाठी स्थानिक वार्ताहर मदतनीस म्हणून मला करण्याची मला संधी मिळाली. बारामतीहून मुख्यमंत्री पवार यांच्याच गाडीत बसून पुणे विमानतळाच्या दिशेने जात असताना मिलर, मी आणि इतर दोन पत्रकारांनी पवार यांची अर्धा-पाऊण तास मुलाखत घेतली. हा एका वेगळाच अनुभव होता. या निवडणुकीच्या शेवटच्या दोन फैरींत सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेस सत्तेवर आली आणि नरसिंह राव पंतप्रधान झाले. त्यांनतर केंद्रातील अस्थिर सरकारांमुळे १९९६, १९९८ आणि १९९९ ला लागोपाठ लोकसभा निवडणूक झाल्या. काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी यांनी १९९८ची पुण्याची लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून लढवली होती, त्यांच्या प्रचारसभेसाठी खुद्द पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आले होते यावर आज अनेकांचा विश्वासही बसणार नाही. कलमाडींच्या उमेदवारीस ठाम विरोध असणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंनी कलमाडींना उद्देशून ‘इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या बेडकाची’ उपमा दिली होती. आणि झालेही तसेच! त्या निवडणुकीत काँग्रेसचे विठ्ठल तुपे जिंकले, कलमाडींचे हाडवैरी बनलेल्या शरद पवारांनी काही महिन्यातच काँग्रेस सोडली अन दोन-तीन दिवसांतच कलमाडी पुन्हा काँग्रेसवासी झाले आणि नंतर पुण्यातून दोनदा लोकसभेवर निवडूनही आले. १९९९मध्ये लोकसभा निवडणुका होणार होत्या. महाराष्ट्रात त्यावेळी शिवसेना-भाजपचे सरकार होते. याच वेळी सोनिया गांधींच्या परदेशी असण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस सोडून शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला. कारगिल युद्ध नुकतेच घडले होते. या घडामोडींमुळे महाराष्ट्रात सहा महिने आधीच विधानसभेच्या निवडणुका घेण्याचा निर्णय बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला. महाराष्ट्रात झालेल्या या दुहेरी निवडणुकीत मतदारांच्या प्रगल्भतेचे दर्शन घडले. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला महाराष्ट्रातील जनतेने झुकते माप देऊन ४८पैकी २८ जागा दिल्या आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार केंद्रात पुन्हा सत्तेवर आले. महाराष्ट्रात मात्र मतदारांनी शिवसेना-भाजप युती सरकारविरुद्ध कौल देऊन राज्यात त्रिशंकू अवस्था निर्माण केली. निवडणुकीचे निकाल आल्यानंतर बरेच दिवस सत्तेसाठी दावा करण्यासाठी कुठलाच पक्ष सामोरे येईना, तेव्हा राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांनी विधानसभा स्थगित ठेवण्याचा इशारा दिला. मग अपरिहार्यता म्हणून राष्टवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसशी घरोबा करून सत्तेवर आली आणि आघाडीची ही सत्ता तब्बल १५ वर्षे टिकली! १९९९नंतर ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या पुणे आवृत्तीत मी रुजू झालो. तेथील नोकरीच्या काळात विधानसभेची वा लोकसभेची कुठलीही निवडणूक झाली नाही. पत्रकारितेच्या माझ्या व्यवसायात निवडणुकीचे वार्तांकन करण्याची संधी मिळाली नाही, असे त्यामुळे ‘टाइम्स ऑफ इंडिया’ हे एकमेव दैनिक ठरले. . सकाळ माध्यम समूहाच्या ‘महाराष्ट्र हेराल्ड’ आणि नंतर ‘सकाळ टाइम्स’ या इंग्रजी दैनिकांसाठी २००४ च्या आणि त्यानंतर झालेल्या सर्व निवडणुकांनिमित्त वार्तांकन करण्याची संधी मला मिळाली. देशात ‘फिल गुड’ आणि ‘इंडिया शायनिंग’ वातावरण असल्याने लोकसभेच्या निवडणुका सहा महिने आधीच घेण्याचा निर्णय भाजपने २००४ साली घेतला. निवडणूक प्रचाराच्या काळात भाजपच्या एका नेत्याच्या साडी वाटपाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन अनेक गरीब महिला ठार झाल्या आणि ‘इंडिया शायनिंग’च्या फुग्याला छोटीशी टाचणी लागली. या घटनेने वातावरण वेगाने बदलत गेले, हे निवडणूक निकालांनंतरच कळाले. वाजपेयी सरकारचा पराभव होऊन काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. या घटनेने अगदी कसलेल्या राजकीय पंडितांनाही धक्का बसला. २०१४ च्या निवडणुका तर अगदी अलीकडच्या आणि त्यामुळे आपल्या सर्वांच्या आठवणीत आहेत. आपला जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश आता पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकांसाठी सज्ज झाला आहे! ............................................................................................................................................. लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत. camilparkhe@gmail.com ..................................................................

Sunday, March 14, 2021

The Shaping Of A Destiny: Moving From Aurangabad To Pune

The Shaping Of A Destiny: Moving From Aurangabad To Pune
Writer's Corner The Shaping Of A Destiny: Moving From Aurangabad To Pune Camil Parkhe Pune, 13th March 2021: After resigning from my job at The Navhind Times in Goa, I had now settled down as a reporter in Lokmat Times English daily in Aurangabad. In Panjim, the bug of the college students union and later the trade union had caught my attention. So soon after coming to Aurangabad, I enrolled myself as a member of the Aurangabad Union of Working Journalists and within six months, after contesting the elections, I became the General Secretary of this trade union. This happened in 1989. The city of Aurangabad was not new to me. I am originally from the Marathwada region as my native village is Wahegaon in Gangapur taluka of Aurangabad district. Soon I fell in love with this historic city, named after the Mughal emperor Aurangzeb and my visits to my home town Shrirampur became monthly instead of fortnightly. This particular incident happened in September. My colleague Mustafa Alam, a crime reporter for the Lokmat Times, had applied for the post of a reporter in Indian Express in Pune. Meanwhile, Mustafa was selected as the Aurangabad correspondent of ‘The Independent’, an English daily based in Mumbai with Bharatkumar Raut, as the executive editor. Thus Mustafa Alam withdrew his application for the reporter’s post at the Indian Express. The Indian Express had decided to introduce its edition in Pune. At that time, Pune did not have many English newspapers. Dileep Padgaonkar, who later became the Editor-in-Chief of The Times of India, had started his career in journalism at the Poona Herald (later the Maharashtra Herald) in the Pune camp. The shortage of experienced journalists was also felt by Lokmat Times where I worked in Aurangabad. In Goa, the same was true of the English dailies ‘The Navhind Times’ and ‘Herald’, and the Marathi daily ‘Gomantak’. The newspaper owners always brought editors from outside Goa for these dailies. After the liberation of Goa from Portuguese rule in 1961, Trimbak Vishnu Parvate took over as the first editor of The Navhind Times, the first English daily published in Goa. When the ‘O Heraldo’, a Portuguese daily, turned into an English daily, Rajan Narayan from Mumbai was appointed as its editor, a position he held for many years. Madhav Gadkari of Marathi ‘Gomantak’, Narayan Athavale, S. S. Kokje of `Navprabha’, were other editors brought from outside Goa. Even today, things have not changed much. Many journalists from Goa, however, have in the past worked and are working in very high posts in the field of journalism in the country and abroad. The Biblical verse uttered by Jesus Christ that ‘Prophet is not honoured in his own town’ applies here. Therefore, Prakash Kardaley, resident editor of the Pune edition of Indian Express, had decided to recruit experienced reporters and sub-editors from outside Pune for the new Pune edition of Indian Express. As per Kardaley’s suggestion, Arif Shaikh, Aurangabad correspondent of the Indian Express, was looking for experienced journalists for the jobs in Aurangabad. Having secured `The Independent’ job in Aurangabad, Mustafa Alam had now turned down the offer for a reporter’s post with the Indian Express in Pune. As a friend, I had accompanied Mustafa when he met Arif Shaikh at the Indian Express office at Gulmandi in Aurangabad to inform the latter about his decision.
Arif Shaikh Arif Shaikh was understandably disappointed when Mustafa Alam turned down the Indian Express job offer at the last minute. At that time, Mustafa blurted out in half jest, “Hey Camil, why don’t you apply for the Indian Express job?” Arif Shaikh immediately heaved a sigh of relief. Yes, this was a good suggestion, he felt. Shaikh and Mustafa then cajoled me to write down my short bio-data and Arif Shaikh immediately typed it on the office teleprinter and transmitted it to Prakash Kardaley’s office in Pune. I just forgot about it when both Mustafa Alam and I got out of the Indian Express office. Three days later, Arif Shaikh sent me a message through Mustafa Alam, asking me to immediately visit the Indian Express office in the city. “Indian Express Pune resident editor Prakash Kardaley has called you for an interview in the Pune office this Friday,” he said. This came as a bombshell to me. When Arif Shaikh and Mustafa Alam persuaded me to submit my bio-data, I had no inkling that something will ever emerge out of this. It had been hardly 10 months since I had joined ‘Lokmat Times’ in Aurangabad. Frankly, I had not thought of resigning from my post or of leaving Aurangabad so soon. Nonetheless, I went to Pune for the scheduled interview. The Indian Express monthly salary for a reporter as per the prevailing Justice Palekar Wage award was too tempting to refuse the job offer. Resident Kardaley did not even refer to the pay scales but simply asked me, “Camil, when can you join us at the earliest?’’ Instantly, I knew that my employment in Lokmat Times and my stay in Aurangabad was going to end soon. Thus it has been over 32 years since I left Aurangabad. Since then, I have not moved out of Pune although I have switched over to many jobs in English newspaper organizations. I worked for 11 years with Indian Express, then at The Times of India for nearly six years and at the Maharashtra Herald-Sakal Times of the Sakal Media Group for astonishingly 16 long years until the Corona outbreak in March 2020 when many reputed newspaper organisations closed down their editions. Arif Shaikh of the Indian Express was indeed instrumental in bringing me to Pune and shaping my career for the last three decades. Many such people come into everyone’s life and do something to shape their destiny. We normally don’t give credit to them or we don’t even talk or think about it. Arif Shaikh and I have never met in the last three decades. Today, I read an article on social media after the passing away of Arif Shaikh. The obit flashed before my mind this very old incident in Aurangabad. (Camil Parkhe is a senior journalist based in Pune. He started his journalism career in Goa and has worked in various newspapers in different capacities.) Camil Parkhe Follow Punekar News:

Sunday, February 21, 2021


 बार्देसकर समाजाची संस्कृती : भाग २

(फोटोमध्ये लेखक कामिल पारखे एका प्रसिद्ध बार्देस्कराबरोबर, येशूसंघीय फादर प्रभुधर, यांच्याबरोबर पुण्यातील पेपल सेमिनरीच्या आवारात)


महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमावर्ती भागात राहत असलेले गोयंकार कॅथोलिकांनी म्हणजेच बार्देसकर समाजाने आपल्या मूळ वैशिष्ठ्यपूर्ण सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा दोनशे वर्षे गोव्यापासून दूर राहूनसुद्धा जपल्या आहेत. त्यांची मातृभाषा कोंकणी टिकवल्यामुळे आणि आंतरजातीय विवाह न केल्यामुळे त्यांना आपली खास ओळख कायम राखण्यात यश आलं आहे. तथापि, त्यांना स्वतःला अथवा त्यांच्या नवीन मातृभूमीतील लोकांना ते `परके’ वाटत नाहीत.

बार्देसकारांच्या गेल्या कित्येक पिढ्या नेहमी खेड्यातील एकाच भागांत राहुन देखील फक्त त्यांच्या घरातच गोवन कॅथोलिक राहिल्या आहेत. पण तरीदेखील त्यांनी इतर समाजांशी सामंजस्य राखले आहे. ते महाराष्ट्रातील कोंकण आणि कोल्हापूर भागांतील नमुनेदार मराठी आणि कर्नाटकातील बेळगांव जिल्ह्यातील वैशिष्ठ्यपूर्ण कन्नडिगा आहेत.
रोमन कॅथोलिक धर्माप्रमाणे कोंकणी भाषा हा त्यांची पूर्वसुरींच्या भूमीशी (गोव्याशी) नाळ जोडणारा एक महत्वाचा घटक आहे. साहजिकच, कालौघात म्हणजेच त्यांच्या लादलेल्या स्थलांतरपासून बार्देसकरांच्या कोंकणी भाषेत मराठी किंवा कन्नडमधील नवीन शब्द आल्यामुळे बरेच मोठे बदल झाले आहेत. तरीसुद्धा, हे शक्य आहे कि बार्देसकरांच्या कोंकणीत असे बरेच शब्द ते अजूनही वापरत असतील, जे गोव्यातील कोंकणीत कधीच नामशेष झाले आहेत. याशिवाय, कित्येक जुनी कोंकणी लोकगीतं ह्या समाजात प्रचलित आहेत, जी विविध सामाजिक प्रसंगी गायली जातात - जसे लग्न, धर्मगुरुदीक्षा आणि इतर धार्मिक सेवा. कोंकणी भाषेच्या संशोधकांना बार्देसकर बोलत असलेल्या कोंकणीत संशोधनाचे मुबलक विषय मिळू शकतील.
काळाच्या ओघात नष्ट होण्याअगोदर त्यांची कोंकणी लोकगीते पुढील पिढ्यांसाठी जपून ठेवण्याची तातडीची गरज आहे. आजदेखील बार्देसकर विविध प्रार्थना म्हणजे पवित्र मिस्सा, रोझरी किंवा पवित्र माळ आणि लितानी कोंकणी भाषेत म्हणतात. गोव्याप्रमाणे इथेही धार्मिक उपासनाविधींसाठी वापरली जाणारी अधिकृत मिस्साग्रंथ किंवा लिटर्जी रोमन लिपीत आहे..
रोजच्या जीवनात कोंकणीचा वापर हा सार्वत्रिक असला तरीदेखील वाङ्मयीन कोंकणी इथपर्यंत अजून पोहचली नाही. काही मोजक्या जेसुईट धर्मगुरुंनी मराठी साहित्यविश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांत मराठी निरोप्या मासिकाचे संपादक फादर प्रभुधर आणि फादर कारिदाद द्रागो उर्फ संदीप हळदणकर यांच्या मोजक्या साहित्यकृती आहेत.
बार्देसकरांबाबत आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे त्यांचा गोव्याशी गेल्या दोन शतकात खूपच कमी संपर्क असूनसुद्धा त्यांनी त्यांच्या मूळच्या मायभूमीत असलेल्या मालमत्तांवर असलेला हक्क सोडला नाही. हे विस्मयकारक आहे कि गोव्यातील राज्यकर्ते हे नेहमीच ब्रिटिशांच्या अमलात असलेल्या भारतीय भागांतून येणाऱ्या लोकांविषयी साशंक असत, तरीसुद्धा कोंकण, कोल्हापूर आणि बेळगांव जिल्ह्यांत वाढलेल्या व तेथे बरीच वर्षे वास्तव्य असलेल्या बार्देसकरांनी पूर्वजांच्या भूमीतील मालमत्तेवर आपला हक्क आजमितीपर्यंत कायम राखला आहे.
मी माझ्या पश्चिम महाराष्ट्र व बेळगांव जिल्ह्यातील वास्तव्यात बऱ्याच बार्देसकरांना भेटलो आहे, जे स्वतःची ओळख गोवन, गोयंकार अशी करून देतात आणि ते बार्देस तालुक्यातील आल्डोना, शिवोली, पार्रा, तिव्हिम व इतर गावचे असल्याचे सांगतात. असं म्हटलं जातं कि गोव्यातील बार्देसकरांच्या पूर्वजांनी आपल्या मुलांची नांवे त्यांच्या गावातील कम्युनिदाद या पारंपारिक सहकारी संस्थांमध्ये नोंदवून ठेवली होती. कित्येक बार्देसकरांनी ते जेंव्हा-जेंव्हा गोव्याला भेट देत, तेंव्हा आपले या संस्थातील भाग, शेअर्स किंवा झोण मिळविले, मग ते कितीही छोटे असोत.
नंतरच्या काळात पोर्तुगीजांनी त्यांच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या `परकियां’विरुध्द कडक कारवाई करण्यास सुरुवात केली तेंव्हा अनेक बार्देसकर सेंट फ्रान्सिस झेविअरच्या दर्शनाच्या निमित्ताने किंवा इतर काही कामासाठी सुरक्षा नसलेल्या सीमेवरील गावांतून गोव्यात प्रवेश करत.
कालपरवापर्यंत म्हणजे कोल्हापूर आणि कोंकणातील कॅथोलिक धर्मविभाग गोवा धर्मप्रांतापासून वेगळे होईपर्यंत आणि ते पुणे धर्मप्रांताशी जोडले जाईपर्यंत या भागातील सर्व चर्चमधील बाप्तिस्मा, लग्न, मृत्य, इ. विषयीच्या नोंदी पोर्तुगीज भाषेमध्ये असत. बार्देसकारांच्या पूर्वजांविषयी नोंदी असलेली महत्त्वाची माहिती आजही कोल्हापूर जिल्हयांतील आजरा, हलकर्णी आणि इतर ठिकाणी असलेल्या धर्मग्रामातील म्हणजे पॅरिशमधील चर्चमध्ये उपलब्ध आहे. काळाला बार्देसकरांना त्यांच्या भूतकाळापासून तोडण्यात अपयश आले आहे. त्यांनी आपला हा भूतकाळ प्रामाणिकपणे तर कधी कट्टरपणे सांभाळून ठेवला आहे.
माझ्या मते बदलाला विरोध हा नव्या कालानुरूप सुसुत्रीकरणामुळे नसून केवळ रूढी टिकवण्यासाठी आहे. उदाहरणार्थ, कित्येक तरुण बार्देसकरांना त्यांच्या समाजातील काही रितीरिवाजांची कारणे माहित नाहीत तरीदेखील ते पाळण्याची इच्छा त्यांच्यात आहे. परिणामी, बार्देसकर समाजातील विविध गटांत लग्ने होत नाहीत कारण धर्मांतरापूर्वी ते वेगवेगळ्या हिंदू जातींत विभागले गेले होते.
जातीयवादाचं अरिष्ट, जरी कॅथोलिक चर्चची त्यावर अधिकृतपणे बंदी असली तरी, गोव्यात प्रचलित आहे व बार्देसकरांनी ते आपल्याबरोबर गोव्याबाहेर आणलं आहे.
बार्देसकर समाजात काही ‘आंतरजातीय’ विवाह गेल्या काही वर्षात झाले आहेत. काही बार्देसकर अजूनही बिफ खात नाहीत, जे पूर्वाश्रमीचे सवर्ण हिंदू असल्याचे दर्शवते.
त्यांच्या गोव्यातील पूर्वजांच्या परंपरेप्रमाणे आजही या भागांतील विविध चॅपेल आणि चर्चमध्ये वार्षिक सणाचा सोहळा साजरा केला जातो. त्याप्रमाणे म्हापसा शहराजवळील शिवोलीहुन आलेले आणि कोल्हापूर जिल्हातील चंदगड तालुक्यातील अडकूर गावी स्थायिक झालेले बार्देसकर सेंट अँथनीचा सण साजरा करतात. दोन वर्षांपूर्वी जेव्हा तेथे एक चॅपेल बांधले गेले तेंव्हा शिवोलीतील रिवाजाप्रमाणे ते सेंट अँथनीच्या स्मृतीस समर्पित करण्यात आले. गोव्याप्रमाणे येथेही चर्चच्या कारभारात महत्त्व असलेली सामान्य लोकांची कॉन्फ्ररिया आहे.
अशाप्रकारे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमेवरील गोवन समुदायाने आपली भाषा, धर्म आणि संस्कृती पोसली आणि सुरक्षितपणे टिकविल्यामुळे त्यांना आपली ओळख पुसली जाण्याची भीती ते रहात असलेल्या नवीन ठिकाणी कधीच वाटली नाही. कारण त्यांची पाळेमुळे तेथे खोलवर रुजली आहेत. बऱ्याच बार्देसकरांना पुणे, कोल्हापूर आणि मुंबई येथे नोकऱ्या मिळाल्या आहेत. तर काही मोजके लोक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत किंवा किंवा आपला व्यवसाय चालवीत आहेत.
((मूळ प्रसिद्धी ३० जून,, १९८५, इंग्रजी दैनिक द नवहिंद टाइम्स, पणजी, गोवा )