Did you like the article?

Showing posts with label Margao. Show all posts
Showing posts with label Margao. Show all posts

Thursday, December 21, 2023

 फ्रान्सिस्को लुईस गोम्स

गोव्यात पणजीला तुम्ही गेला तर दयानंद बांदोडकर मार्गावर कला अकादमीजवळ कंपाल गार्डनमध्ये एक पूर्णाकृती पुतळा दिसतो.
पणजीत असे पुतळे फार कमी आहेत, पोर्तुगीज वसाहतीच्या खुणा असलेल्या बहुतेक जुन्या पुतळ्यांची रवानगी खूप वर्षांपूर्वी वस्तूसंग्रहालयात करण्यात आली आहे.
आदिलशहा पॅलेस किंवा जुन्या सेक्रेटरीएटजवळ असलेला ऍबे फरिया यांचा पुतळा त्यातून वाचला, तसाच कंपाल गार्डनमधला हा पुतळासुद्धा.
दोन्हीबाबत कारण एकच आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या या दोन्ही व्यक्ती `निज गोंयकार' आहेत.
पणजीला नेहेमी येणाऱ्याजाणाऱ्या व्यक्तींचे कंपाल गार्डनमधील या पुतळ्याकडे सहसा लक्ष नाही. अनेक वर्षे मी मिरामार बिचजवळ आणि नंतर ताळगावला राहिलो, बसने आणि दुचाकीने येता-जाताना या पुतळ्याविषयी कुतूहल वाटायचे.
अगदी गोव्यातील अनेक लोकांनासुद्धा या फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांच्याविषयी फार माहिती असण्याची शक्य कमीच आहे. हा पुतळा शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९२९ साली पोर्तुगाल राजवटीतच गोम्स यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उभारला गेला होता.
गोव्यात आणि भारताच्या इतर भागांत पोर्तुगालची साडेचारशे वर्षे सत्ता होती. या काळात गोव्यातील नागरिकांना पोर्तुगालच्या नागरिकांप्रमाणे पोर्तुगाल संसदेत निवडून येण्याचे अधिकार आणि हक्क होते.
पोर्तुगालच्या संसदेचे सभासद म्हणून फ्रान्सिस्को लुईस गोम्स गोव्यातून लिस्बनला दोनदा गेले होते.
त्यानंतर कितीतरी वर्षांनी म्हणजे अठराव्या शतकाच्या अखेरीला दादाभाई नौरोजी हे ब्रिटिश संसदेचे सदस्य म्हणून निवडले गेले होते.
नौरोजी हे ब्रिटिश संसदेवर निवडून गेलेले एकमेव भारतीय. त्यानंतर ब्रिटिश भारतात स्थानिक संसदीय मंडळे स्थापन झाली.
फ्रान्सिस्को लुईस गोम्स ( `फ्रान्सिश्कु लुईश गॉमीश' असा पोर्तुगीज भाषेत उच्चार) यांच्याप्रमाणेच अनेक गोमंतकियांना पोर्तुगाल संसदेचे सदस्य होण्याचा सन्मान मिळाला, काही जण पोर्तुगीज मंत्रीमंडळात होते.
सद्याचे पोर्तुगालचे पंतप्रधान अंतोनिओ कोस्टा ( पोर्तुगीज भाषेत आंतोनियु कॉश्ता) तर मूळचे गोंयकार, मडगावचे.
काल पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली तिथे ओलिव्हियानो जे एफ गोम्स (ओलीव्हिन्यु गॉमीश) यांनी फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचे लिहिलेले, नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलेले, हे चरित्र दिसले आणि पटकन विकत घेतले.
वाचल्यानंतर लिहिन त्यांच्यावर.
आज डिसेंबर १९ गोवा मुक्तीदिन.. गोंय मुक्ती दिसाची परबीं....
Camil Parkhe

Wednesday, December 13, 2023



आज खूप दिवसांनी खरे तर काही महिन्यांनी सुकटाची चटणी नाश्त्याला खाल्ली. ही चटणी तशी घरी काल रात्रीच तयार झाली होती पण तेव्हाच ठरवलं होतं नाश्त्याला खायची म्हणून. सकाळी श्रीधरनगर बागेत फिरायला गेलो तेव्हा छानपैकी कोवळे ऊन पडले होते आणि बॅडमिंटन खेळण्यासाठी एक ताज्या दमाचा पार्टनर गडीसुद्धा मिळाला. छान घामाघूम झालो होतो पण तेव्हाही मनात घरी असलेल्या सुकटाच्या चटणीची आठवण होतीच. मला स्वतःलाच त्याबद्दल हसूही आले होते.
लहानपणापासून माझ्या एक अत्यंत आवडीचा असलेला हा पदार्थ आजही खास आवडीचा आहे. सुकट आणि बोंबलाची चटणी हे दोन्ही पदार्थ बरोबरीने येतात, ज्याला सुकट आवडते त्याला बोंबीलसुद्धा आवडणार असे मला वाटते. इथे मी सुके बोंबीलबद्दल बोलतो आहे, ओले बोंबील हा वेगळा खाद्यपदार्थ आणि वेगळा विषय आहे. आठवड्यातून किमान एकदोनदा आमच्याकडे रात्रीला तळलेले ओले बोंबिल असतातच. त्याबद्दल नंतर कधीतरी स्वतंत्रपणे लिहिता येईल.
चिकनच्या दुकानांच्या मानाने मासळीची दुकाने तुरळक असतात. मात्र आमच्या कॉलनीच्या तोंडालाच मासळीचे मोठे दुकान आहे. तिथे शनिवारी आणि रविवारी लोकांची झुंबड तुम्ही एकदा पाहायला हवी.
तर श्रीरामपुरला शुक्रवारी दुपारी पाचच्या दरम्यान आठवडी बाजारात बाईचे बोट धरून मी जायचो तेव्हा सर्व पदार्थ घेतल्यानंतर सर्वात शेवटी सुकट आणि सुक्या बोंबलाची खरेदी व्हायची. शुक्रवारी आमच्या घरी कधीही मटण शिजत नसायचे वा खाल्ले जात नसे. त्याला कारण म्हणजे गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवारचा संबंध. गंमत म्हणजे मात्र मासे किंवा अंडे या पदार्थांना वशटचा दर्जा नसायचा, त्यामुळे हे पदार्थ शुक्रवारी वर्ज्य नसायचे.
घरी आल्यावर सगळा बाजार पिशवीतून बाहेर काढल्यावर बाई सुके बोंबील साफ करायची, काटेरी डोके आणि शेपूट काढून निम्मे बोंबिल वेगळे काढून ठेवायची आणि बाकीच्या बोंबलाचे त्याच रात्री काळा मसाला घालून कालवण करायची. दर शुक्रवारी आणि शनिवारी बाई आणि दादांचा उपास असायचा, या दिवसभराच्या उपवासाला फक्त पाणी आणि चहा चालायचा. तो उपास बोंबलाच्या या चमचमीत कालवणाने सुटायचा.
मग आठवड्यातून एकदा सुक्या बोंबलाची तर दोनदा सुकटाची चटणी नाश्त्याला असायची. या दोन्ही चटण्या करायची ती पध्दत आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. सुके बोंबील आधी पाट्यावर वरवंट्याने टेचून घ्यायचे, ते बारीक चपटे झाल्यावर हिरव्या किंवा लाल मिरच्या, लसूण घालून पाट्यावर वरवंटा फिरवून एकजिनसी बनवायचे आणि मग तव्यावर तेलाने मस्तपैकी परतून घ्यायचे.
सुकट चटणी करायची पध्दत जवळपास अशीच. बाजरीच्या भाकरीबरोबर मग ही बोंबलाची चटणी किंवा सुकटाची मस्त लागायची.
मी तसा काही `फुडी' वा खवय्या या सदरात मोडणारी व्यक्ती नाही. अशा फूडी लोकांना खाद्यपदार्थांची खास चव असते, खास आवडीनिवडी असतात, त्यांच्या जिभेला विशिष्ट पदार्थांची चव लगेच कळते. माझे तसे नाही. तरीसुद्धा सुकटाची चटणी हा माझा एक खास आवडीचा पदार्थ आहे.
मला आवडते म्हणून एकदा मी श्रीरामपूरहून गोव्याला परत जाण्यासाठी निघालो तेव्हा बाईने सुकटाची चटणी आणि बाजरीची भाकर बरोबर दिली होती. त्यावेळी त्याकाळच्या नॅरो-गेज रेल्वेने प्रवास करताना मिरज- लोंढा स्टेशनच्या दरम्यान रात्री नऊच्या आसपास वर बर्थवर बसलेलो असताना जेवणाचा डबा उघडल्यानंतर माझ्यावर काय प्रसंग गुदरला होता तो किस्सा मागे मी इथे सांगितला होता, त्याची पुनरावृत्ती टाळतो.
गोव्यात पावसाळा सुरू झाला की ताजी मासळी फारशी मिळत नाही तेव्हा मग घरात साठवून ठेवलेली सुकी मासळी जेवणात चव आणते. गोंयकरांच्या दररोजच्या जेवणात मासळी असायलाच हवी. मग ही सुकी मासळी - कधी तळलेली कधी नुसतीच भाजलेली - ताटात येते. हे सुके बोंबिल, तार्ली, बांगडा, सुरमई जेवणात आणि जीवनातसुद्धा चव आणतात.
गोव्यात बहुसंख्य सर्व लोकांना - यात सारस्वत मंडळींसुद्धा आलीच - मासे अत्यंत प्रिय असतात. गोव्यातल्या सारस्वत लोकांत सारस्वत ब्राह्मण तसेच सारस्वत ख्रिश्चनांचाही समावेश होतो. पणजी आणि मडगावसारख्या मतदारसंघांत या दोन्ही सारस्वतांची संख्या लक्षणीय आहे. वर्षातून काही ठराविक दिवशी जेवणात ताजे किंवा सुके मासे नसले तर त्यादिवशी शिवराक जेवण खाणारे कसे कडू तोंड करतात हे गोव्यात शिकत असताना मी अनुभवले आहे.
गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री असलेले मनोहर पर्रीकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत संरक्षणमंत्री होण्यासाठी बोलावून घेतले. केन्द्रात फक्त संरक्षणमंत्रीपदासाठी राज्यातील मुख्यमंत्री बोलावून घेण्याची प्रथा तशी यशवंतराव चव्हाण, शरद पवार आदींपासून आहे.
तर संरक्षणमंत्री पर्रीकरांचे मन राजधानीत कधी रमलेच नाही, याचे एक प्रमुख कारण म्हणजे नवी दिल्लीत ताजे मासे मुळी मिळतच नाही असे खुद्द पर्रीकरांनी सांगितले आहे.
त्यामुळे पहिली संधी मिळताच म्हणजे त्यांच्या अपरोक्ष गोव्यातल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे पानिपत झाल्यानंतर सत्तेचे नवी समीकरणे जुळवण्यासाठी पर्रीकर मायभूमीत परतले होते.
गोव्यातले माझे एक मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार वामन प्रभू यांनी आपल्या `मनोहर पर्रीकर, ऑफ द रेकॉर्ड' या पुस्तकात दिल्लीत माशाविना कासावीस झालेल्या पर्रीकरांचा एक किस्सा लिहिला आहे.
``दिल्लीत त्यांना ताजे मासे मिळणे मुश्किल झाले होते. ``जलबिन मछली' अशीच काहीशी त्यांची अवस्था झाली होती.'' गोव्यातून त्यांना भेटण्यासाठी दिल्लीचे येणाऱ्या कोणाही जवळच्या व्यक्तीने विचारणा केली तर `विसवणाची तळलेली पोस्ता' (रवा लावून तव्यावर तळलेली सुरमई ) आणण्यास ते प्रेमाने सांगत असत असे वामन प्रभूंनी लिहिले आहे.
पर्रीकरांप्रमाणेच कालपरवा एका जवळच्या व्यक्तीने सुकट आणि बोंबलाची चटणी करून देण्याचा आग्रह केला म्हणून बाजारातून सुकट आणि सुके बोंबील आणले.
आमचे घर अगदी वरच्या मजल्यावर असल्याने या खाद्यपदार्थांचा घमघमाट संपूर्ण इमारतीत पसरत नाही. ज्यांना हे पदार्थ आवडतात त्यांच्या मात्र तोंडाला पाणी सुटत असते.
Bon Appetit . . .

Camil Parkhe, 

Thursday, June 27, 2019

Goa's great son : Abe de Faria

 

 

   आधुनिक संोहनशास्त्राचे जनक ॅबे (’ादर) ’रिया

 

काि पारखे, पुणे

गोव्यातील पणजीला आपण  जर कधी गेला असाल तर तेथील मांडवी नदीच्या तीरावर असलेला आदिलशाही राजवाडा किंवा जुने सचिवालय तुम्ही नक्कीच पाहिले असेल. अगदी अलिकडच्या काळापर्यंत दरवर्षी फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला पणजीत होणार्या कार्निव्हलची  मिरवणूक पणजी बसस्टॅन्डपासून निघून येथूनच पुढे सरकत असयाची. यावेळी किंग मोमोच्या औट घटकेच्या म्हणजे अवघ्या चार दिवसांच्या राजवटीचे गोव्यात स्वागत करण्यासाठी हजारो लोक येथे उत्साहाने जमले असायचे. गोव्याची राजधानी पणजी शहराचा हा केंद्रबिंदू. मध्ययुगीन काळातील आदिलशाहाच्या या राजवाड्याच्या दोन्हीही बाजूला दोन पुतळे उभारण्यात आलेले आहेत. या दोन पुतळ्यांपैकी एक पुतळा गोवा, दमण आणि दीवचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा आहे. राजवाड्याच्या दुसर्या बाजूला असलेला पुतळा कुणाच्याही मनात कुतुहल निर्माण करेल अशा स्थितीत आहे. या पुतळ्यामधे एक झगाधारी मनुष्य आपले दोन्ही हात उभारून एका स्त्रीला संमोहित करण्याचा प्रयत्न करत आहे असे जवळून निरीक्षण केल्यास दिसून येते. हा पुतळा 18 व्या शतकातील युरोपमधील वैज्ञानिक संमोहनविद्या शास्त्राचे जनक आणि गोव्याचे सुपुत्र ॅबे डी फरिया यांचा आहे.

 

पणजी बसस्टॅण्डवरून पायी चालत तुम्ही या आदिलशाहाच्या पॅलेसकडून दयानंद बांदोडकर मार्गावरुन मिरामार बिचकडे निघाला कि मांडवीच्या काठावर इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या अनेक वास्तू आणि कलाकृती तुम्हाला दिसतीलयात कला अकादमीसारख्या वास्तूशास्त्रज्ञ चार्ल्स कोरीयानिर्मित आधुनिक वास्तूची भर पडलेली आहे. पणजीत आल्यावर या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या ॅबे डी फरियाच्या या शिल्पाला भेट द्यायलाच हवी. याचे कारण  म्हणजे ॅबे फरिया या व्यक्तिमत्वाचे कर्तृत्व !

 

1980 च्या दशकात मी पणजीतील दि नवहिंद टाइम्स या स्थानिक इंग्रजी वृत्तपत्रासाठी बातमीदार म्हणून काम करीत होतो. तेंव्हा हा एकमजली कौलारी छत असलेला आदिलशाहाचा राजवाडा तात्कालीन गोवा, दमण आणि दीव या केंंद्रशासित प्रदेशाचे सचिवालय वा मंत्रालय होते. या मंत्रालयाच्या एका कोपर्यात असलेली एक खोली आम्हा पत्रकारांसाठी एक प्रेस रुम म्हणून दिली होती. आम्हा इंग्रजी दैनिकातील पत्रकारांसाठी एक छोटेसे टेबल आणि टाईपरायटरची  सोय होतीमुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, त्यांचे इतर सहकारी मंत्री, मुख्य सचिव इतर अधिकाऱ्यांना आम्हा पत्रकारांशी कधीही  बोलायचे असल्यास आम्हाला त्यांना भेटायचे असल्यास ही प्रेस रूम खूपच सोयीस्कर ठरायची. ''आता राणेंक मेळु या, 'सभापती दयानंद नार्वेकरांने आपयले आमकां'  `रमाकांत खलप (त्यावेळचे विरोधी पक्षनेता ) आयलो मरे' असे म्हणत आम्ही प्रेसरुममधून पहिल्या मजल्यावर बातमीच्या शोधात जात असू.

 

काही दिवसांपूर्वी गोव्यात गेलो तेव्हा कुतुहलाने मुद्दाम या प्रेस रुमकडे वळालो तेव्हा एक सुखद धक्का बसला. या आदिलशाहा राजवाड्यातून  गोवा राज्याचे सचिवालयाचे काही वर्षांपूर्वी पोरवोरीम येथे स्थलांतर झाले असले तरी या मध्ययुगीन राजवाड्यातील त्या छोट्याशा खोलीवर आजही प्रेसरुम असा फलक आजही कायम आहे ! ते पाहून आणि खरेच आनंदून बायकोला सांगून तिथे त्या फलकासह मी माझे स्वतःचे  एकदोन  फोटो स्मरणरंजनाचा एक भाग म्हणून पटापटा काढून घेतले. तर या आमच्या त्या जुन्या प्रेस रुमच्या अगदी काही फुटांच्या अंतरावर ॅबे  फरिया यांचा हा पुतळा आहे. मी गोवा सोडून  तीस वर्षे झाली असली तरी या ॅबे फरिया यांच्या या पुतळ्याबाबतचे  माझ्या मनातील आकर्षण आजही कमी झालेले नाही. याचे कारण म्हणजे ॅबे फरिया याचे आगळेवेगळे व्यक्तिमत्व

 

सन 1961 च्या डिसेंबरमध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी लष्करी कारवाई करुन त्याकाळी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला गोवा,दमण आणि दीव  मुक्त केला आणि हा छोटासा प्रदेश भारतसंघराज्याचा भाग बनला. गोवामुक्तीनंतर गोव्यातील अनेक मोक्याच्या ठिकाणी असलेल्या दर्यावर्दी वास्को गामा, अफांसो दि अल्बुकेर्क सारख्या  पोर्तुगीज  गव्हर्नर जनरल आणि व्हॉईसरॉय इतर अधिकाऱ्यांच्या पुतळ्यांची उचलबांगडी होऊन त्यांची वस्तुसंग्रहालयात रवानगी करण्यात आली. मात्र पणजीत 1945 साली म्हणजे पोर्तुगीज राजवटीतच उभारण्यात आलेला ॅबे डी फरिया यांचा हा पुतळा या ठिकाणी आजही सन्मानपूर्वक राहिला आहेयाचे कारण म्हणजे ॅबे डी फरिया यांचे कर्तृत्व युरोपात म्हणजे रोम, पोर्तुगाल आणि फ्रान्स येथे फुलले असले तरी ते गोव्याचेच सुपुत्र आहेत.

 

दहा फूट उंचीचा ॅबे डी फरिया यांचा हा कांस्य पुतळा पाहून या परिसरात जाणार्या येणार्या लोकांच्या मनात साहजिकच कुतूहल निर्माण होते. जोस कस्टडिओ फरिया किंवा ॅबे डी  फरिया यांचा जन्म गोव्यात बार्देस तालुक्यातील समुद्रकिनार्यावर असलेल्या कांदोळी या गावात 31 मे 1756 मध्ये झाला. या  गोमंतकियाने नंतर युरोपात एक कॅथोलिक धर्मगुरु म्हणून नाव कमावले. ॅबोट किंवा मठामध्ये राहणार्या ख्रिस्ती धर्मगुरुस फ्रेंच भाषेत ॅबे म्हणतात. पॅरीसमध्ये असताना ॅबे डी फरिया यांनी संंमोहनशास्त्रात मॊल्यवान योगदान दिले, संंमोहनशास्त्रावर फ्रेंच  भाषेत त्यांनी  ग्रंथ लिहिला, गोव्यातील पोर्तुगीज राजवट उलथून टाकण्याचा प्रयत्न करणार्या प्रसिध्द पिंटो उठावातही त्यांचा सहभाग होता, हे विशेष. अलेक्झांडर ड्युमास याच्या ' काऊंट ऑफ मोन्त क्रिस्टो' या गाजलेल्या कादंबरीत एका धर्मगुरुचें पात्र ॅबे डी फरिया यांच्यावर बेतलेले आहे. या कादंबरीवर आधारीत काही आणि मूळ कादंबरीइतकेच गाजलेले चित्रपटही आहेत. ॅबे डी फरिया यांच्या व्यक्तिमत्वाने अशाप्रकारे इतिहासकारांना आणि इतरांनाही आकर्षित केलेले आहे

जोस कस्टडिओचे म्हणजे ॅबे डी फरियाचे वडील कैतानो व्हितोरिनो डी फरिया हे मूळचे बार्देस तालुक्यातीलच कोलवाले या गावचे. सोळाव्या शतकाच्या अखेरीस अनंत शेणई या सारस्वत ब्राह्मणाने ख्रिस्ती धर्माचा  स्वीकार केला होता. कैतानो हे या अनंत शेणई यांचे वंशज होते.

ॅबे फरिया यांच्या आईवडिलांची पार्श्वभूमीही वेगळीच होती. त्याचे वडील कैतानो हे ख्रिस्ती धर्मगुरू होण्यासाठी सेमिनरीत शिकत होते. परंतु धर्मगुरुपदाची दीक्षा होण्याआधीच त्यांनी   सेमिनरी सोडली. कांदोलीच्या रोझ मारिया डिसोझा या युवतीशी त्यांचे लग्न झाले. या दांपत्याला जोस कस्टडिओ हा  मुलगा झाला. कैतानो आणि रोझ या दोघांमध्ये मात्र कधीही सुसंवाद असा नव्हताच. त्यामुळे हे लग्न फक्त सहा वर्षेच टिकले.त्यानंतर ते दोघे पतिपत्नी परस्पर संमतीने वेगळे झाले. परस्परापासून वेगळे झाल्यानंतर कैतानो आणि रोझ मारिया डिसोझा या दोघांनीही सन्यासी धार्मिक व्रत स्वीकारण्यासाठी चर्चची परवानगी   मिळवली. विवाहीत व्यक्तींना अशाप्रकारे सन्यासी व्रतबंध सहसा दिले जात नाही. अशाप्रकारे कैतानो यांनी धर्मगुरुपदाचे शिक्षण घेण्यास पुन्हा सुरुवात केली तर रोझा एक नन म्हणजे धर्मभगिनी होण्यासाठी जुन्या गोव्यातील सेंट मोनिका कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला. सेंट मोनिका कॉन्व्हेंट या मठाची भव्य वास्तू अजूनही अस्तित्वात आणि वापरात आहे.

 

सन्यासी धर्मगुरुपदाचे शिक्षण घेणारे वडिल आणि मठामध्ये नन असलेली आई यांचा  मुलगा म्हणून जोस कस्टडिओला स्थानिक समाजाने कलंकित मानले.

संन्यासी दाम्पत्याचा मुलगा म्हणून त्याला खूप मनस्ताप सहन करावा लागला. कैतानो फरिया हे अत्त्यंत महत्त्वाकांक्षी होते. आपल्या मुलाची ही परिस्थिती पाहून गोव्यात राहून तो कधीही प्रगती करु शकणार नाही, असे यांना वाटले. त्यामुळे ते आपल्या मुलासोबत 1771 मध्ये गोवा सोडून पोर्तुगालला गेले. तेथे त्यांचा मुलगा जोस कस्टडिओ धर्मगुरु धर्मगुरु होण्यासाठी एक मठात दाखल झाला. पुढे रोम येथे धार्मिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 12 मार्च 1780 रोजी त्यांचा धर्मगुरु म्हणून दीक्षाविधी झाला. विशेष म्हणजे रोम येथील विद्यापीठात ईशज्ञान या विषयात डॉक्टरेट मिळविणाऱ्या पहिल्या काही गोमंतकिय धर्मगुरुंमध्ये सिनियर आणि ज्युनियर फरिया यांचा समावेश होता. ज्युनियर ॅबे फरियाने नंतर तत्त्वज्ञान विषयात दुसरी डॉक्टरेट मिळविली. ॅबे फरियाने त्यानंतर आपल्या मायभूमीत  कधीही पाऊल ठेवले नाही.

 

एक उत्तम प्रवचनकार म्हणून ॅबे फरिया प्रसिध्द होते. असे म्हटले जाते की रोम येथील प्रसिध्द सिस्टाईन चॅपलमध्ये पवित्र आत्म्याच्या  सणानिमित्त उपदेश करण्यासाठी पोप पायस सहावे यांनी ॅबे फरियांना 1780 साली निमंत्रित केले होते. त्यावेळी ते फक्त 24 वर्षांचे होते. गोव्यातील ऐतिहासिक राशोल सेमिनरीतील प्राध्यापक फादर आयवो सोझा यांनी लॅटिन भाषेतील या प्रवचनाचे इंग्रजीत भाषांतर केले आहे.

 

ॅबे  फरिया यांच्या जीवनातील एका महत्वपूर्ण धटनेचा त्यांच्या आयुष्यावर फार मोठा प्रभाव पडला. असे म्हणतात कि त्या घटनेने त्यांच्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळाली. रोमहून लिस्बन येथे परतल्यानंतर पोर्तुगालच्या राणीने आपल्या चॅपेलध्ये प्रवचन देण्यासाठी या तरुण धर्मगुरुला निमंत्रित केले. फर्डे वक्ते असलेले ॅबे फरिया प्रवचन देण्यासाठी उंचावर असलेले पुलपीट चढून गेल्यावर बोलण्याआधी त्यांना दरदरुन घाम  फुटला. त्यांचे वडिल त्यावेळी त्या  पुलपीठाजवळच मागे उभे होते. आपल्या चिरंजिवाची ती घाबरलेली अवस्था पाहून त्यांनी त्याच्या कानात आपल्या मातृभाषेत म्हणजे कोकणी भाषेत  फक्त दोनच वाक्य उच्चारली. ती  वाक्ये ऐकताच ज्युनियर  फरियाची भीती पूर्ण गायब झाली. कोकणी भाषेतील त्यांना धीर देणारे ते वाक्य असे होते. ’’पुता, ही सोगली भाजी, कातोर रे भाजी!‘ (अरे बाळा, तुझ्या समोरची ही सगळी आहे पालेभाजी, काप ही सगळी भाजी !‘)  ही दोन वाक्ये ऐकल्यावर आपला आत्मविश्वास कमावल्यावर ज्युनियर ॅबे फरिया यांनी पोर्तुगालची राणी आणि जमलेल्या इतर लोकांसमोर प्रभावी प्रवचन केले.

 

या छोट्याशा घटनेचा तरुण ॅबे फरियावर खोलवर परीणाम झाला. त्या केवळ एका वाक्यामुळे आपल्या  मनातील भीती दूर होऊन या भितीची जागा प्रचंड आत्मविश्वासाने कशी घेतली याचा त्यांना सतत अचंबा वाटत राहिला. यामुळेच पुढे  संमोहनशास्त्राबाबत खोलवर संशोधन करण्याचे बीज त्यांच्या मनात रोवले गेले.

 

सिनियर फरिया आणि ज्युनियर फरिया हे दोघेही 1787 मध्ये गोव्यात घडलेल्या पोर्तुगीज सरकारविरोधी पिंटो बंडात सक्रिय होते. त्याकाळात गोमंतकीय धर्मगुरुंमध्ये आणि स्थानिक लष्करी अधिकार्यांमध्ये पोर्तुगीज सत्तेविरुध्द प्रचंड असंतोष खदखदत होता. ग़ोमंतकीय धर्मगुरुंना आणि लष्करी अधिकार्यांना नेहेमीच सापत्नपणाची वागणूक मिळते, त्यांना डावलले जाते, अशी त्यांची भावना होती. याचीच परिणती 1787 सालच्या पिंटो बंडात झाली, गोव्यातील साम्राज्यवादी पोर्तुगीज सरकारविरोधी स्थानिक लोकांनी केलेला हा दुसरा उठाव होता.

 

पोतुर्गीज सरकारने हे बंड मोडून काढले. पोर्तुगीज सरकारकडून त्यांच्याविरुध्द कारवाई टाळण्यासाठी ज्युनियर ॅबे फरिया लिस्बनहून फ्रान्सला पळून गेले. त्यानंतर फ्रान्स हीच त्यांची कर्मभूमी बनली. फ्रान्समध्ये त्यांनी संमोहनशास्त्राचा अभ्यास करुन या कलेचे प्रात्यक्षिक करुन तेथे मोठे  नाव कमावले. एक कॅथोलिक धर्मगुरु संमोहनशास्त्राचे समर्थन करतो हे अनेक धर्मगुरुंना आणि चर्चच्या धर्माधिकाऱ्यांना आवडले नाही. संमोहन करणे हे चेटूकगिरी, ब्लॅक मॅजिक आणि सैतानाचे कृत्य आहे असे चर्चमधील त्यांच्या विरोधकांचे म्हणणे होते.

 

मात्र  संमोहन विद्या आणि कॅथोलिक चर्चची शिकवणी परस्परविरोधी नाही असे ॅबे फरिया यांचे म्हणणे होते. संमोहनविद्येत सहभागी होण्यास नकार देणार्या व्यक्तींना संमोहित करणे अशक्यच असते, त्यामुळे संमोहन विद्यामध्ये कुणावरही कसल्याही प्रकारची जबरदस्ती केली जात नाही, असा त्यांचा दावा होता. असे म्हटले जाते की ॅबे फरिया यांनी आपल्या संमोहनविद्येचे सुमारे 5000 लोकांवर प्रयोग केले आणि या प्रयोगातून त्यांनी अनेक लोकांना त्यांच्या  मानसिक रोगांतून बरे केले होते.

 

ॅबे फरिया यांचे  ३० सप्टेंबर १८१९ रोजी निधन झाले. फ्रेंच भाषेत प्रकाशित झालेल्या त्यांच्या  या पुस्तकात संमोहन विद्येची अनेक मार्गदर्शक तत्वे त्यांनी मांडली होती. त्यांच्या मृत्युपूर्वी  काही दिवस आधी हा ग्रंथ  (ऑन कॉज ऑफ ल्युसिड स्लीप इन स्टडी ऑफ नेचर ऑफ मॅनप्रकाशित झाला होता. मात्र त्यांच्या  मृत्युनंतर एका शतकानंतर ॅबे फरिया यांना आधुनिक संमोहनविद्येचे जनक म्हणून मान्यता मिळाली. गोव्याचे सुपुत्र असलेल्या ॅबेरिया यांच्या जीवनावर किंवा त्यांच्या कार्यावर आधारित बहुतेक सर्व पुस्तके फ्रेंच वा पोर्तुगीज भाषांत आहेत. ॅबे फरिया यांच्या फ्रेंच भाषेतील महान ग्रंथाचा कोकणी कवी आणि फ्रेंच भाषेतील विद्वान मनोहरराय सरदेसाई यांनी इंग्रजीत अनुवाद केला आहेत.

 

पणजी येथील ॅबे फरिया यांचा हा पुतळा गोमंतकीय जेष्ठ शिल्पकार रामचंद्र पांडुरंग कामत यांनी घडवलेला आहे. दिनांक 20 सप्टेंबर 1945 रोजी या शिल्पाचे अनावरण झाले. प्रतापगडावरील शिवाजी महाराजांचा कास्य पुतळाही शिल्पकार रामचंद्र पांडुरंग कामत यांचीच कलाकृती आहे. दक्षिण गोव्यातील मडगाव शहरातील एक महत्त्वाचा रस्ता ॅबे फरिया यांच्या नावाने ओळखला जातो. रुआ ॅबे डी फरिया हे त्या रस्त्याचे नाव. ॅबे फरियांच्या 250 व्या जयंतीनिित्त 2006 साली पोर्तुगाल सरकारने गोव्याच्या या सुपुत्राच्या पणजीतील पुतळ्याच्या छायाचित्रावर आधारीत एक खास पोस्टकार्डाचेही अनावरण केले होते.

 

ॅबे फरिया यांचे फ़्रान्समध्ये निधन झाले आणि त्यांची कबर पॅरिस शहरातील मोन्तमार्त्र  परिसरात कुठेतरी आहे असे म्हटले जाते. पॅरिसमधला  मोन्तमार्त्र हा परिसर तेथील  टेकडीवर असलेल्या भव्य  सेक्रेड हार्ट बॅसिलिकासाठी प्रसिध्द आहे. अलीकडेच आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या नोत्र डेम ऑफ पॅरीस या चर्चइतकीच इतकीच सेक्रेड हार्ट बॅसिलिका प्रसिद्ध आहे. अभिजात आणि आधुनिक चित्रकलेचे रसिक असलेल्या लोकांचेही  मोन्तमार्त्र  हे आवडते स्थळ आहे.

काही वर्षापूर्वी कुटुंबियाबरोबर युरोपच्या सहलीवर असताना पॅरिसमध्ये आमचे  मोन्तमार्त्र येथेच एक आठवडाभर वास्तव्य होतेमोन्तमार्त्रच्या गजबजलेल्या रस्त्यांवर फिरताना, तेथील जमिनीवरील आणि भूमिगत मेट्रोतून प्रवास करताना तेथेच कुठेतरी ॅबे फरिया या गोमंतकीयाच्या  चिरसमाधीची जागा  असू शकेल असा विचार माझ्या मनात येत असे. गोव्याच्या या महान सुपुत्राची पॅरीसमधली कबर कदाचित कधीही सापडली जाणार नाही. मात्र संमोहनविद्येच्या क्षेत्रात त्यांनी केलेले योगदान आणि त्यांचा वारसा कधीही विस्मृतीत जाणार नाही.

 

    The plaque on the northern side reads: JOSÉ CUSTODIO FARIA (ABADE FARIA) FUNDADOR DE DOUTRINA E METODO DA HIPNOSE PELA SUGESTÃO (José Custodio Faria, Abbé Faria founder of the Doctrine and Method of Hypnosis by Suggestion).