बांगडा:
आजकाल बाजारात बांगडा नेहमीपेक्षा खूप मोठ्या आकारात मिळतो आहे. आणि बऱ्यापैकी स्वस्त. इतर कुठल्याही मासळीपेक्षा मला स्वतःला बांगडा अधिक आवडतो.
याचे कारण म्हणजे साफ करायला, तळायला आणि करीमध्ये  वापरायला बांगडा मला अधिक सोयिस्कर वाटतो. अर्थात सर्वात महत्त्वाचे  म्हणाजे चवीबद्दल तर काय बोलणार?  .
ओले बोंबिल पण मला आवडतात. तेसुद्धा साफ करायला एकदम सोयिस्कर. मात्र तळायला भयंकर वेळ लागतो आणि रात्री आपण घाईत असलो तर अशा प्रकारचे वेळखाऊ मासे नकोच वाटतात. 
बांगडा मी नेहेमी दुकानातून साफसूफ आणि पूर्ण डोके कापून घेतो, मात्र चिरे न मारता. त्यामुळे घरी आल्यावर पुन्हा एकदा ते साफ करता येतात. कल्ले वगैरे नीट साफ करता येतात,   
काल घरी साफ करताना काही बांगड्याच्या पोटांत जाडजूड अंडी मिळाली. ही अंडी सुद्धा तळून चवीने खाल्ली जातात हे मला माहित आहे मात्र मी स्वतः खात नाही. तरीही ती अंडी टाकून देताना वाईट वाटलेच. 
मागे एकदा एका जणाला कोंबडीच्या पाचसहा अंडयांतील पिवळे बलक (हानिकारक किंवा कोलेस्ट्रॉल असणारे म्हणून)  असेच टाकून देताना पाहिले होते आणि वाईट वाटले होते, त्याची आठवण झाली.
तर मग बांगडे चिरून, त्यावर मस्तपैकी मसाला चोपडून मंद आचेवर तळून घेतले.  अन मग ... 
यापैकी तळलेले काही बांगडे करीसाठी वापरले. ओले खोबरे घालून तयार केलेली फिशकरी आणि राईस माझी एक आवड आहे. 
Camil Parkhe January 18, 2024
