Did you like the article?

Showing posts with label Gandhi Bhavan. Show all posts
Showing posts with label Gandhi Bhavan. Show all posts

Thursday, August 27, 2026

 


पुण्यात बुधवारी नेहा बोरा हिचा दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम होता.

त्यापैकी एका - कोथरुडच्या गांधी भवनमधील- कार्यक्रमाला मी हजेरी लावली.
गांधी भवनातील अनेक उपक्रमांना मी जात असतो.
तेथील श्रोते आणि वक्तेही नेहेमीच बुजुर्ग मंडळी असतात. साठी आणि सत्तरी ओलांडलेलेच जास्त.
सभागृह क्षमतेच्या निम्मेही कधी भरलेले नसते.
नेहा बोराच्या कालच्या कार्यक्रमात सभागृहात प्रवेश करताना मला गर्दीत अंग चोरुन जावे लागले, कसेबसे भिंतीला पाठ लावून उभे राहून भाषणे ऐकावी लागली इतकी तिथे गर्दी होती.
मोकळया जागेत अनेकांनी बसकण मारली होती.
सर्वांत विशेष म्हणजे श्रोत्यांमध्ये तरुणाईचा मोठा भरणा होता आणि श्रोत्यांपैकी बहुतांश लोक नेहाला ऐकण्यासाठीच आले होते.
नेहाचे भाषण संपले आणि इतर भाषणे ऐकण्यासाठी सभागृहात बसण्यासाठी लगेचच भरपूर खुर्च्या खाली झाल्या यावरुन ते दिसून आले.
नेहा बोरा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. आज संध्याकाळी तिचा नागपुरात कार्यक्रम आहे.
महाराष्ट्रात हल्ली मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर झेन झी कार्यक्रमाच्या अग्रस्थानी आहेत.
कुठलाही उत्स्फूर्त सार्वजनिक उठाव वा क्रांती नव्या नेत्यांना जन्म देते असे म्हटले जाते.
नव्या पिढीच्या विविध प्रश्नांच्या निमित्ताने देशाच्या राजधानीत जंतरमंतरवर अवतरलेल्या पोरांपोरींच्या आंदोलनाने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
कॉक्रेच जनता पार्टीचे अभिजित दीपके, सौरभ दास, आशुतोष रांका, कम्युनिस्ट पक्षप्रणित ऑल इंडिया स्टुडंट्स असोशिएशनची राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोरा या मंडळीने सत्ताधारी किंवा सत्तेच्या बाजूने असणाऱ्या लोकांना अगदी जेरीस आणले आहे.

ज्यांनी अजून वयाची तिशीही ओलांडली नाही अशी मुलंमुली अचानक ऑनलाईन बातम्या, रील्स, छोट्या मुलाखती, मिम्स वगैरे माध्यमांतून गेली अनेक दिवस झळकतायेत आणि त्यांना प्रत्युत्तर देताना देशातील राज्यकर्त्या लोकांची दमछाक उडाली आहे.
सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना तरुणाईच्या मागे धावावे लागत आहे, त्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे लागत आहे.
झेन झी आंदोलनाने काँग्रेस पक्षाला आणि राहुल पक्षाला संजीवनी मिळवून दिली आहे. दोघेही एकमेकांवर कुरघोडी न करता, परस्परांकडे स्पर्धक म्हणून न पाहता पूरक म्हणून काम करत आहेत.
इतर नेत्यांप्रमाणे राहुल गांधी केस रंगवून आपले वय लपवत नाही तरी तरुणतरुणींमध्ये त्यांच्याबद्दल जाम क्रेझ आहे.
राहुल गांधी यांना मुली सहजगत्या स्पर्श करतात, त्यांना आलिंगन देतात. एक मुलगी तर चक्क गालावर किस करते.
सत्तेची पाठराखण करत तरुणाईला साद घालणाऱ्या नेत्यांसमोर असा काही बाका प्रसंग आला तर त्यापैकी काही जण स्कॅण्डलाईज्ड होऊन सार्वजनिक आयुष्यातून निवृत्तीच पत्करतील.
मुख्य प्रसारमाध्यमे अजून तरी तरुणांच्या या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असली तरी नव्या पिढीने या माध्यमांना कधीच अडगळीत टाकले आहे.

Camil Parkhe August 27, 2026
See less