जगभरातील
आणि महाराष्ट्रातील ख्रिस्ती सण
ख्रिस्ती धर्मात
ख्रिसमस किंवा
नाताळ, लेंट
सिझन किंवा
उपवासकाळ, होली
विक, गुड
फ्रायडे, ईस्टर
हे सर्वांत
महत्त्वाचे सण
आहेत. जगभरचे
ख्रिस्ती धर्मीय आपापल्या
स्थानिक संस्कृतींची
आणि परंपरांची
त्यात भर
घालून हे
सण साजरा
करतात. महाराष्ट्रातील
बहुसंस्कृतीचे
वरदान लाभलेला ख्रिस्ती
समाजही त्यास
अपवाद नाही.
नाताळ किंवा
ख्रिसमस हा
उत्साहाने साजरा
होणारा सण
देवपुत्र
येशू ख्रिस्ताचा
जन्मदिन म्हणून
अनेक देशांत
२५ डिसेंबरला
साजरा केला
जातो. रशिया
आणि इतर
काही देशांतील
ऑथोडॉक्स पंथीय
लोक मात्र
ख्रिसमस सहा
जानेवारीला साजरा
करतात. याचे
कारण म्हणजे
ग्रेगरियन कॅलेंडर
या देशांत
अजून पूर्णतः
स्वीकारले गेलेले
नाही.
ख्रिसमस सणाभोवती विविध देशांत अनेक प्रथा
कालांतराने रुढ झाल्या आणि नंतर या सणाचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. रेनडिअरच्या
गाडीतून बर्फाळ भागात सहल करत, लोकांच्या घरांच्या चिमणीतून म्हणजे धुरांड्यांतून ख्रिमाच्या
रात्री प्रवेश करत मुलांसाठी भेटवस्तू ठेवून पसार होणारा सांता क्लॉज त्यापैकी एक.
फादर ख्रिसमस
, सेंट निकोलस
किंवा नुसतंच
सांता अशा
नावांनी ओळखली
जाणारी सांताक्लॉज
ही व्यक्तिरेखा
ख्रिसमसच्या सणाचा
एक अविभाज्य
भाग आहे.
मात्र हे दंतकथेतील एक पात्र आहे. बायबलमध्ये किंवा इतर
धार्मिक पुस्तकांत संत क्लॉज हे पात्र कुठेही नाही.
सांताक्लॉज ही
व्यक्तिरेखा बिशप
निकोलसची जोडलेली
आहे. एका कथेनुसार
बिशप निकोलस
दररोज रात्री
वेषांतर करून
अडचणीत असलेल्यांना
मदत करत
असत. सेंट
निकोलस या
नावाचा अपभ्रंश
म्हणजे सांताक्लॉज.
ख्रिसमस ट्री,
ख्रिसमस ग्रिटींग्सकार्ड्स,
ख्रिसमस क्रिब्स
किंवा ख्रिस्तजन्माचा
देखावा, नाताळाच्या
आधी काही
दिवस घरोघरी
जाऊन ख्रिसमस
कॅरोल्स किंवा
ख्रिस्तजन्माची गायने
गाणारी युवकयुवतींचे
ग्रुप्स, चकाकता
ख्रिसमस स्टार
अशा कितीतरी
गोष्टी ख्रिसमसचे
आनंददायी वातावरण
निर्माण करत
असतात.
डिसेंबर महिना सुरू झाला की, लहानपणापासून सतत कानावर पडलेली अशी कितीतरी नाताळाची मराठी गीतं कानांत गुंजू लागतात. त्यापैकी एक तर चक्क येशूबाळाचा पाळणा आहे. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व ख्रिस्ती लोकांनी तो कधी ना कधी ऐकलेला असतोच. ख्रिस्तजन्माचा तो पाळणा असा-
धृ. घेई घेई घेई जन्म माझ्या मनी
तुझ्या जन्मदिनी ख्रिस्तबाळा
१. आवडला तुज जन्म गव्हाणीत
तसा मन्मनात आवडावा
येशूजन्माची अशी कितीतरी पाळणागीतं मराठीत गेल्या शतकाच्या काळात रचली गेली आहेत. ही पाळणागीतं महाराष्ट्रातील विविध कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट चर्चमध्ये नाताळ सणाच्या काळात भक्तिभावानं गायली जातात.
यापैकी पुढील ‘प्रभुचा पाळणा’ या नावानं खुद्द ‘स्मृतिचित्रे’कार लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिला आहे-
हलवी मना प्रभुपाळणा हा
त्यजुनी सुखातें वरी यातनांना ||धृ||
पराकारणें जो झिजवी तनूला
यशोगान त्याचें मुदें गात गाना
हलवी मना, प्रभुपाळणा ||१||
बॉम्बे ट्रॅक्ट अँड बुक सोसायटी, मुंबईने प्रकाशित केलेल्या ‘उपासना संगीत’ या पुस्तकात हा पाळणा समाविष्ट आहे. त्यात अशी अनेक नाताळगीतं आणि शेकडो भक्तीगीतं आहेत. गेल्या शतकातील रेव्हरंड नारायण वामन टिळक आणि कृष्णा रत्नाजी सांगळे प्रभुतींचं यात फार मोठं योगदान आहे.
ख्रिसमसच्या साधारणतः १०-१५ दिवस आधी कॅरोल सिंगर्सच्या तुकड्या ख्रिस्तमसची गाणी घरोघरी आणि इतर ठिकाणी म्हणण्यासाठी बाहेर पडतात.. हे कॅरोल सिंगर्स गायनासाठी येतात, तेव्हा शेजारच्या घरांतील मुलंबाळं आणि मोठी मंडळीसुद्धा नाताळगीतं ऐकण्यासाठी जमत असतात. सांता क्लॉजसुद्धा कॅरोल सिंगिंगमध्ये रंगत आणतो.
नाताळाच्या आधी आमच्या घरी आठ-दहा दिवस दररोज संध्याकाळी करंज्या, लाडू, चकल्या, अनारशी वगैरे फराळ बनवण्याचं काम सुरू व्हायचं, ते मध्यरात्रीपर्यंत चालायचं. नाताळाच्या या फराळाची ताटं शेजारच्या माळी-मराठा आणि मुसलमान घरांतही जाणार असल्यानं पितळाचे मोठमोठे डबे गच्च भरून हे पदार्थ व्हायचे.
आजही ख्रिसमस ट्री सजवताना आणि सणाची तयारी करताना ख्रिसमस कॅरोल्सचं पार्श्वसंगीत वेगळ्याच दुनियेत घेऊन जातं. प्रत्येकाच्या या सणाविषयीच्या कितीतरी सुखद आठवणी असतात.
लेंट सिझन (उपवासकाळ), होली वीक
ख्रिस्ती धर्मियांचा चाळीस दिवसांचा उपवास काळ - लेंट सिझन - दरवर्षीं मार्च-एप्रिल याच काळात येतो.
नाताळाची आणि इतर ख्रिस्ती सणांची तारीख ठरलेली असते, लेन्ट सिझन आणि यामध्ये येणाऱ्या झावळ्यांचा रविवार (पाम संडे), गुड फ्रायडे आणि इस्टर संडे मात्र याला अपवाद. या तारखा विशिष्ट आकडेवारी करून ठरवतात, ख्रिस्ती धर्मियांचा लेन्ट सिझन सद्या चालू
आहे. या उपवासकाळाची सांगता १८ एप्रिलला
येणाऱ्या गुड फ्रायडेने होणार आहे.
या चाळीस दिवसांच्या उपवासकाळाची किंवा लेन्ट सिझनची सुरुवात होते ती फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीस येणाऱ्या भस्म बुधवाराने किंवा अँश वेन्सडे या दिवसाने, या भस्म बुधवाराच्या आधल्या शनिवारी गोव्यात, लॅटिन अमेरिकेन आणि इतर पाश्चिमात्य राष्ट्रात कार्निव्हल फेस्टिव्हल सुरुवात होते आणि या उत्सवाची भस्म बुधवाराच्या पूर्वसंध्येला मंगळवारी रात्री सांगता होते, या प्रायश्चितकाळात शक्यतो लग्नकार्यासारखे कुठलेही मंगलकार्य हाती घेतले जात नाही.
हा उपवासकाळ चाळीस दिवसांचा आहे असे मानले जाते तरी प्रत्यक्षात हा काळ त्याहून अधिक दिवसांचा असतो, याचे कारण म्हणजे या उपवासकाळात येणारे रविवार आणि चर्चच्या सणाचे (फेस्ट) दिवस यातून वगळले जातात.
होली वीक
या लेन्ट सिझन किंवा उपवासकाळातील सर्वात महत्त्वाचे दिवस म्हणजे होली वीक किंवा पवित्र आठवडा. `पाम संडे’ किंवा झावळ्यांच्या रविवारी सुरु होणाऱ्या या आठवड्यात पवित्र गुरुवार, गुड फ्रायडे म्हणजे उत्तम शुक्रवार येतो आणि ईस्टर रविवाराने या आठवड्याची सांगता होते.
पाम संडेपासून सुरु झालेला आणि ईस्टर संडेला संपणारा हा होली वीक अध्यात्मिकदृष्ट्या अगदी ख्रिसमसपेक्षाही महत्वाचा. याचे कारण म्हणजे येशू ख्रिस्ताचे अवतारकार्य म्हणजे खुप वेदना सहन करून क्रुसावर मरणे आणि तीन दिवसांनंतर इस्टर रविवारी मृत्यूतून पुनरुज्जीत होणे. वर्षभर रविवारी देवळाकडे न फिरकणारे अनेक ख्रिस्ती जण ख्रिसमसप्रमाणेच या पवित्र आठवड्यातल्या सर्व प्रार्थनाविधींना आवर्जून हजर असतात.
येशू ख्रिस्ताने गाढवीच्या एका शिंगरावर बसून जेरुसलेम शहरात आपल्या शिष्यांसमवेत प्रवेश केला तेव्हा या नगरवासियांनी त्याचे अत्यंत उत्साहाने स्वागत केले, यास्मरणार्थ झावळ्यांचा रविवार साजरा केला जातो.. झावळ्यांचा रविवारी सर्व चर्चेसमध्ये नारळाच्या झावळ्या घेऊन, 'होसान्ना, होसान्ना ! हे गीत म्हणत प्रतिकात्मक मिरवणूक काढली जाते.
या होली वीकमधील `मौंडी थसडे’ किंवा पवित्र गुरुवार या दिवशी येशू ख्रिस्ताने आपल्या बारा प्रेषितांबरोबर शेवटचे भोजन केले, शतकोनुशतके वेगवेगळ्या चित्रकारांनी या `लास्ट सपर' ला (प्रभूचे शेवटचे भोजन) आपल्या खास शैलीत रेखाटले आहे. लिओनार्दो दा व्हिन्सी वगैरे नामवंत चित्रकारांनी या `द लास्ट सपर'ची घटना आपापल्या खास शैलीत चित्रित केली आहे.
या भोजनात सहभागी झालेला यहूदा किंवा ज्युडास मग आपल्या प्रभूचे चुंबन घेऊन त्याला त्याच्या मारेकऱ्यांच्या हवाली करतो. रोमन साम्राज्याचा प्रतिनिधी पिलात येशूला रोमन रिवाजानुसार क्रुसावर खिळण्याची सजा फर्मावतो. क्रुसावर शेवटचा श्वास घेण्याआधी येशू म्हणतो : हे बापा, यांना क्षमा कर कारण ते काय करतात हे त्यांना माहीत नाही.''
हा दिवस म्हणजे गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवार. मात्र तरीसुद्धा हा दिवस `गुड फ्रायडे’, याचे कारण म्हणजे येशूच्या क्रुसावरच्या मरणाने अख्ख्या मानवजातीचे तारण झाले असे मानले जाते. मात्र तिसऱ्या दिवशी ईस्टर संडेच्या भल्या पहाटे येशू ख्रिस्त मृत्यूवर विजय मिळवून पुनरुज्जिवित झाला अशी श्रद्धा आहे. नाताळापेक्षाही ईस्टर संडेला अधिक महत्त्व आहे ते या अर्थाने.
उपवासाचे नियम चर्चने हल्ली खूपच शिथिल केले,आहेत, संपूर्ण चाळीस दिवसांत फक्त अँश वेन्सडे म्हणजे भस्म (राखेचा) बुधवार आणि गुड फ्रायडे ऑब्लिगेटरी आहेत, बाकी सर्व दिवस पूर्णतः ऐच्छिक !
आजारी व्यक्ती आणि सज्ञान नसलेली मुले यांना उपास करणे बंधनकारक नाही. जगभर देवावर, धर्मावर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे निदान चर्चमध्ये येणाऱ्या लोकांसाठी आपले नियम बदलण्याची, लवचिक होण्याची तयारी चर्चने दाखविली आहे हेही नसे थोडके.
आता. गुड फ्रायडेच्या प्रार्थना आता भर दुपारी टळटळीत उन्हात न घेता उन्हे कललल्यानंतर संध्याकाळी होतात. हल्ली वाळूच्या मैदानात गुडघे टेकून आत्मक्लेश करत कुणी प्रार्थना करत नाहीत. उलट चर्चमध्ये भाविकांना बसण्यासाठी प्रशस्त बाके असतात, मिस्साविधीत अधूनमधून गुडघे ही टेकावे लागतात तेव्हा गुडघ्यांना रग लागू नये, म्हणून त्या लाकडी फळ्यांवर मऊमऊ रंगीत कुशन्ससुद्धा असतात !
हल्ली हवा खेळती राहण्यासाठी आजूबाजूला अनेक पंखे असलेल्या चर्चमध्ये या गालिच्यासारख्या मुलायम असणाऱ्या कुशन्सवर गुडघे टेकताना लहानपणी रणरणत्या उन्हात वाळूवर गुडघे टेकण्याचा प्रसंग अनेकदा आठवतो. हा बदल त्या कुशन्ससारखाच सुखावह असतो.
आजकाल जगभर ख्रिसमस
हा केवळ ख्रिस्ती समाजाचाच उत्सव राहिला नाही. हल्ली विविध शाळांत,
उद्योगकंपन्यांत, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि हॉटेलांत ख्रिसमस अगदी उत्साहाने साजरा
होतो. या सोहळ्यात सर्वधर्मीय लोक सहभागी होतात आणि एकमेकांना आनंदी करतात.
तसे पाहिले तर विशिष्ट धार्मिक विधीचा अपवाद वगळता
कुठल्याही सणाचे वा उत्सवाचे स्वरुप आणि उद्दिष्ट असेच सर्वसमावेशक आणि सर्वांना
आनंदीत करणारे असायला हवे.
$$$$
No comments:
Post a Comment