Did you like the article?

Tuesday, March 14, 2023

महात्मा फुले तत्वज्ञानी आणि विचारवंत ? ?

गोव्यात मिरामारच्या धेंपे कॉलेजातून बारावी पास झालो. बी ए साठी प्रवेश घेताना पसंतीचे कुठले विषय निवडायचे असा प्रश्न होता. अभ्यासक्रमात दोन भाषा सक्तीच्या होत्या, त्यात इंग्रजी आणि हिंदी आल्या आणि मी मराठी माध्यमातून आल्याने साहजिकच मराठी विषय घेतला. इंग्रजी येत नसल्याने या तीन विषयांनी दिलासा दिला. चला, निदान तीन विषयांत सहजतेने पैलतिरी जाता येईल असा विचार होता.
आता प्रश्न होता इतर तीन विषय निवडण्याचा. तोही प्रश्न लगेच निकालात लागला. गोव्यात मी जेसुईट फादर होण्यासाठी आलो होतो. धर्मगुरू बनण्याच्या प्रदीर्घ प्रशिक्षणात (तेरा- चौदा वर्षे) तत्त्वज्ञान आणि ईशज्ञानाची तीनचार वर्षे होती त्यामुळे त्याचवेळी तत्त्वज्ञान विषयाची मी निवड केली.
बी ए प्रमाणेच एम ए ला सुद्धा तत्त्वज्ञान हाच माझा मुख्य विषय होता. मध्यंतरी मी जेसुईट धर्मगुरू होण्याचा माझा इरादा बदलला होता. तर पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाच्या या पाच वर्षांच्या काळात मी भारतीय आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान शिकलो. अगदी आपल्या शंकराचार्य, चार्वाकपासून तो थेट ग्रीक सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टोटल आणि मध्ययुगीन कांत, देकार्त, स्पिनोझा आणि अलीकडचे कार्ल मार्क्स, सिग्मंड फ्राईड, महात्मा गांधी, मानवेंद्र नाथ किंवा एम एन रॉय, लोकमान्य टिळक वगैरेंच्या तत्त्वज्ञानाची थोडीफार तोंडओळख झाली.
विनोबा भावे, जिडू कृष्णमूर्ती, बर्नार्ड रसेल, लॉजिकल पॉझिटिव्हिझमचे (तेव्हाही हयात असलेले) प्रणेते सर ए जे एयर, वगैरेचे भरपूर वाचून झाले. `भगवान' ओशो रजनीश यांचे आगळेवेगळे तत्त्वज्ञानसुद्धा आकर्षित करणारे असेच होते.
एम ए ला शिकत असताना त्यावेळी मी पणजीतल्या द नवहिंद टाइम्सचा रिपोर्टरही होतो, त्यामुळे मी लोकमान्य टिळक विरुद्ध गोपाळराव आगरकर, मानवेन्द्र नाथ रॉय यांचा `रॅडीकल ह्युमॅनिझम', राम शेवाळकर यांच्या भाषणमालिकेच्या आधारावर `रामायण' यावर मी आमच्या इंग्रजी दैनिकात आणि नवप्रभा या जुळ्या मराठी भावंडात चक्क लेख लिहिले.(आता याबाबत नवल वाटते. हे लेख मी आजही जपून ठेवले आहेत ).
एम ए ला तर मी चारु मुझुमदार आणि नक्षलबारी (नक्षलवादी ) चळवळ यावर चक्क डेझर्टेशन लिहिलं होतं. त्याकाळात ( !) डावी आणि पुरोगामी चळवळ जाम जोरात होत्या आणि कॉलेजांत - विद्यापीठांत बहुतेक शिक्षक डावीकडे झुकलेले असत.
आता मूळ मुद्द्यावर यायला हरकत नाही. गेले काही दिवस माझे महात्मा जोतिबा फुले यांच्या चरित्राचे आणि कार्याबाबतचे वाचन चालू आहे. आणि अचानक लक्षात आले.
महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांचा त्याकाळात आमच्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात अंतर्भाव केला नव्हता. आताची स्थिती मला ठाऊक नाही.
धनंजय कीरकृत जोतीराव फुले यांचे चरित्र वाचताना मला आणखी एक धक्का बसला, फुले यांचे चरित्र लिहिण्याची प्रेरणा कीर यांना कशी मिळाली याविषयी त्यांनी प्रस्तावनेत लिहिले आहे.
नामवंत चरित्रकार कीर यांचे एक वैशिष्ठय म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि विनायक दामोदर सावरकर यांची चरित्रे त्यांनी हे दोन चरित्रनायक हयात असताना आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून लिहिली.
तर अशाच एका मुलाखतीदरम्यान बाबासाहेबांनी त्यांची एक खंत व्यक्त केली. ती खंत म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांना स्वतःला त्यांचे एक गुरु असलेल्या जोतिबा फुले यांचे चरित्र लिहिण्याची प्रबळ इच्छा होती, मात्र आता वयोमानानुसार आणि प्रकृतिच्या कारणास्तव त्यांना आता ते शक्य नव्हते असे त्यांनी कीर यांना सांगितले.
त्याचवेळी कीर यांनी बाबासाहेबांना आश्वासन दिले कि त्यांची इच्छा ते स्वतः पूर्ण करतील.
बाबासाहेबांना दिलेला शब्द कीर यांनी पाळला आणि जोतिबा फुले यांचे विस्तृत आणि संदर्भासह म्हणता येईल असे इंग्रजीत चरित्र लिहिले, ते साल होते १९६४.
जोतिबा गेल्यानंतर तब्बल सात दशकानंतर त्यांचे असे चरित्र लिहिले जात होते ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे असे मला वाटते. आजही कीर यांचे हे चरित्रच फुले यांचे प्रमाणभूत चरित्र मानले जाते.
लोकमान्य टिळक यांचे १९२० साली निधन झाले आणि केवळ वर्षभराच्या कालावधीत नरसिंह चिंतामण केळकर यांनी त्यांचे विस्तृत चरित्र लिहून, प्रसिद्धसुद्धा केले होते ! आणि हे चरित्र खंडात्मक, चांगले जाडजूड आणि त्याकाळात प्रचलीत असलेल्या पाल्हाळिक भाषेत आहे.
केवळ महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानांत अत्यंत महत्त्वाचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्य करणाऱ्या जोतिबा फुले यांच्याकडे इतका प्रदीर्घ काळ दुर्लक्ष व्हावे याचे आश्चर्य वाटते.
टिळक-आगरकर यांची डोंगरीच्या तुरुंगातून १०० दिवसांनी सुटका झाली तेव्हा महात्मा फुले यांनी या दोन उगवत्या नेत्यांची मिरवणूक काढून सत्कार केला होता. टिळकांच्या `केसरी'ने मात्र जोतिबा फुले यांच्या निधनाची बातमीसुद्धा छापली नाही.
पण हा झाला त्याकाळचा इतिहास, नंतरच्या काळातील विचारवंतांनी फुले यांच्या कार्याकडे आणि विचारांकडे इतका काळ दुर्लक्ष का केले असावे?
फुले फार उच्चशिक्षित नव्हते, मॅट्रिकसुद्धा झालेले नव्हते, पण त्यांच्या कार्याची आणि विचारांची झेप आजही अचंबित करेल अशीच आहे. थॉमस पेन याच्यासारख्या तत्त्वज्ञानाने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या विचाराला दिशा दिली आणि देशात एक नवा विचार आणि काम उभे केले.
शिक्षण उच्च वर्गीयांपासुन झिरपत झिरपत खालच्या लोकांपर्यंत येईल हा लॉर्ड मॅकलेचा सिद्धांत किंवा पिरॅमिड त्यांनीं नाकारला आणि हंटर कमिशनसमोर भारतीयांची बाजू मांडताना तो पिरॅमिड चक्क उलटा असावा अशी क्रांतिकारक मांडणी करणारे ते पहिलेच विचारवंत !
(काही काळ युरोपियन ख्रिस्ती मिशनरीसुद्धा मॅकालेच्या याच पिरॅमिडवर विसंबून राहिले होते, नंतर फारसे उच्चवर्णिय धर्मांतर करत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी समाजाच्या सर्वांत खालच्या तळागाळातल्या लोकांमध्ये आपले कार्य सुरु केले.)
१८५७च्या उठावाबाबत जोतीबांचे मत तर अगदी चाकोरीबाहेरचे, धक्कादायक.. म्हणून तर मुद्दाम येथे ते देत नाही.
धनंजय कीर यांनी आपल्या चरित्राचे शिर्षकच मुळी `महात्मा जोतिराव फुले फादर ऑफ इंडियन सोशल रिव्होल्यूशन' असे ठेवले आहे. मूळ पुस्तक इंग्रजीत आहे. या पुस्तकामुळे जोतिबा फुले यांचे कार्य पहिल्यांदा राष्ट्रपातळीवर परिचित झाले.
तर मला पडलेला प्रश्न : अशा या महात्मा फुले यांची विचारवंतामध्ये, तत्त्ववेत्त्यांमध्ये का बरे गणना होत नाही?

तर मला पडलेला प्रश्न : अशा या महात्मा फुले यांची विचारवंतामध्ये, तत्त्ववेत्त्यांमध्ये का बरे गणना होत नव्हती ?

महात्मा जोतिबा फुले यांना तत्त्वज्ञानी, समाजशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि राजकीय विचारवंत म्हणून मान्यता खूप उशिरा मिळाली. त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल शंभर वर्षांनंतर ! तरीसुद्धा अगदी नाईलाजाने आणि कुरकुरत. भारतात मंडळ आयोगाचे वारे फिरू लागले, पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी १९९०ला मंडळ आयोगाच्या शिफारसी मान्य करून त्या राबवण्याचा निर्णय घेतला आणि विविध मागासवर्गिय जमातींमध्ये त्यानंतर जागृती आणि संगठन झाले. विविध लेखकांनी आणि विचारवंतांनी जोतिबा फुले यांच्या क्रांतिकारक विचारांना आपल्या लेखणीतून मांडले. तोपर्यंत दुर्लक्षित केलेले जोतिबा आणि सावित्रीबाई फुले याचे कार्य आणि विचारधन मग प्रकाशात आले. त्यानंतरच विद्यापीठांच्या आणि इतर पातळीवरच्या अभ्यासक्रमांत फुले यांचे तत्त्वज्ञान पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आले.

No comments:

Post a Comment